जि.प.सर्व साधारण सभा: त्या नेत्याकरिता निवड प्रक्रिया; अन अध्यक्षांना पडला प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • शिक्षण विभागामार्फत पदोन्नती रखडली आहे.
  • शिक्षण विभागामार्फत नुकतीच 81 शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
     

यवतमाळ: शिक्षण विभागामार्फत पदोन्नती रखडली आहे. तसेच शाळेची गुणवत्ता घसरल्याचे मुद्दा मंगळवारी (ता.11) सर्व साधारण सभेत उपस्थित करून सदस्यांनी अधिकार्‍यांवर कुरघोडी केली. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्‍न निर्माण करून अधिकार्‍यांवर प्रश्‍नांचा भडीमार करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षखाली सभा बोलाविण्यात आली होती. सभेदरम्यान शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलवर दिलेल्या माहितीत चुकीची बिंदू नामावली करून झाली आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागामार्फत नुकतीच 81 शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर शिक्षण संघटनेकडून आयुक्त कार्यालयात धाव घेऊन आयुक्तांपुढे आपले मत मांडले. यावरून आयुक्तांनी शिक्षण विभागाने दिलेले आदेश रद्द केले. यामध्ये जिल्हा परिषदेवर नामुसकी ओढवली आहे. 

शिक्षण विभागाकडून अनेक वेळा चुकीचे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते श्रीधर मोहोड यांनी करून शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांची बदली झाली आहे. त्यांना तत्काळ कार्यमुक्त करा, अशी मागणी सभेत केली, त्याचबरोबर मागील दिवाळीपासून तासिका शिक्षकांचे मानधन रखडले आहे. ते तत्काळ करण्यात यावे, यावर सीईओ जलज़ शर्मा, अध्यक्ष माधुरी आडे व सदस्यांत सविस्तर चर्चा झाली असून, यासंदर्भात शासनाकडे योग्य मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

शिक्षण समितीत निमंत्रीत शिक्षकांची नियुक्ती केल्या जाते. यासंदर्भात गुरुवारी (ता.13)ला सभा बोलाविण्यात आली आहे. मात्र, शिक्षण सभापती नंदिनी दरणे यांच्यावर अविश्‍वास पारित झाल्याने होऊ घातलेल्या शिक्षण सभापती निवड प्रक्रियेनंतर ही निमंत्रित शिक्षक निवड प्रक्रिया का ठेवण्यात आली नाही, यामागे काय दडले आहे असा सवाल मनिषा गोळे यांनी उपस्थित करून सभेला धारेवर धरले. 

आरोग्य विभागामार्फत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक ठिकाणी कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा देखील सदस्यांनी उपस्थित करण्यात आला. यावर यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात बायोमेट्रीक मशीन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत आरोग्य केंद्रातच उपस्थित राहावे लागणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
 

अन...अध्यक्षांनाच पडतो प्रश्‍न 
जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देत असताना अध्यक्ष माधुरी आडे यांनी अधिकार्‍याला मलाच एक प्रश्‍न पडला आहे.यापुढे आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित राहणार का ? अशी विचारणा केली त्यामुळे अध्यक्षांनाच प्रश्‍न पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
 

सभागृहाचा खर्च गेला पाण्यात 
जिल्हा परिषद सभागृहावर लाखो रुपये खर्च झाले. मात्र, आज बोलाविण्यात आलेल्या सभेदरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने दोन तास सदस्यांना अंधारात बसावे लागले. याबाबत सदस्यांनी विचारणा केली असता कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. त्याचबरोबर सभागृहात बसविण्यात आलेले एसीसुद्धा बंद असल्याने सदस्यांत सभागृहावरील खर्च पाण्यात गेला का असी चर्चा रंगली होती. मात्र,याप्रकाराचे कोणत्याही अधिकार्‍यांला सोयर सुतक नसल्याचे सभेदरम्यान दिसून आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News