रोबोकॉन स्पर्धेत "जिका'ची टीम सायब्रॉटिक्‍स देशात सातवी

अतुल पाटील
Monday, 29 July 2019

दिल्लीतील आयआयटी येथे झालेल्या राष्ट्रीय डी. डी. रोबोकॉन स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया (जिका) च्या "टीम सायब्रॉटिक्‍स'ने देशातून सातवा क्रमांक पटकावला आहे. तसेच मॅथवर्क प्रस्तुत मॅटलॅब मॉडेलिंग स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत 35 हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. रोबोकॉन स्पर्धेत देशातून 87 टीमनी सहभाग नोंदविला. 

औरंगाबाद : दिल्लीतील आयआयटी येथे झालेल्या राष्ट्रीय डी. डी. रोबोकॉन स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया (जिका) च्या "टीम सायब्रॉटिक्‍स'ने देशातून सातवा क्रमांक पटकावला आहे. तसेच मॅथवर्क प्रस्तुत मॅटलॅब मॉडेलिंग स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत 35 हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. रोबोकॉन स्पर्धेत देशातून 87 टीमनी सहभाग नोंदविला. 

एबीव्ही रोबोकॉन हीदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असून यात विविध देश सहभागी होतात. दरवर्षी एका देशाकडून थीम सांगितली जाते. त्यानुसार मंगोलियाने दिलेल्या थीमप्रमाणे घोड्याची प्रतिकृती असणारा स्वयंचलित आणि मानवाधारित रोबोट बनवयचा होता. स्वयंचलित रोबोटने मार्गात असलेली एक पायरी, दोरी आणि चढ चढणे अपेक्षित होते. त्यामुळेच ही स्पर्धा आव्हानात्मक होती. दोन स्तरावर स्पर्धा झाली. अंतिम फेरीत मराठवाड्यातून केवळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची टीम सायब्रॉटिक्‍स पोचली होती. 

रोबोकॉन प्रकल्पाला महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने आर्थिक साहाय्य देऊन विद्यार्थ्यांना रिसर्च आणि इनोव्हेशन साठी प्रोत्साहित केले. महाविद्यालयात 27 ऑगस्ट 2018पासून काम सुरु होते. टीमचा कर्णधार प्रितम अनाप तर उपकर्णधार स्वप्नील पिंपळे यांनी काम पाहिले. प्रो. एम. एस. हरणे, डॉ. एस. बी. चिकलठाणकर, प्रो. आर. पी. चौधरी, प्रो. एम. एस. भालचंद्र, प्रो. एस. एस. अग्रवाल, डॉ. व्ही. ए. कुलकर्णी, प्रो. एम. एस. मोरे, संदीप कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

अशी आहे टीम सायब्रॉटिक्‍स.. 
कर्णधार पितम अनाप, सौरभव सातपुते, अर्चित वडळाकर, स्वप्निल पिंपळे, प्रतिक्षा हिवरेकर, प्रिती सोनगडे, वैभव जाधव, संघर्ष भवर, अनिकेत मुर्तडक, अनघा देव, मृणाली देशपांडे, निलेश अभंग, ऋतुजा महाले, मल्हार गर्जे, अंशुल पांडे, व्यंकटेश महामुने, अनुपमा दारकोंडे, स्नेहाशिष साहा, अक्षय अष्टुलकर, नागनाथ हिंगमिरे, ऐश्‍वर्या बलखांडे, चिरायु गोरंट्याल, अद्वैत कुलकर्णी, प्रवण दुधाने, सत्यम महाकालकर, शिवम गुप्ता यांचा समावेश आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News