झी मराठीवरील "ही" मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

झी मराठीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. मात्र यातील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मुंबई : झी मराठीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. मात्र यातील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेता सुबोध भावे याची "तुला पाहते रे" मालिकेने तर वेगळे स्थान निर्माण केले आहे. दरवेळी नवीन वळण घेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस उतरली. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या मालिकेची संपूर्ण कथा पूर्वनियोजित होती. त्यामुळे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची अजिबात शक्यता नसल्याचे सुबोध याने यापूर्वीच सांगितले होते. मालिकेत ईशा आणि विक्रांतच्या लग्नानंतर विक्रांतच्या पहिल्या बायकोच्या इंट्रीसाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

त्यामुळे काही दिवस या मालिकेचा टीआरपी देखील टॉपला होता. सध्या राजनंदिनीचा पुनर्जन्म म्हणजेच ईशा असल्याचं मालिकेत दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे ईशाचे वेगळे रूप यामध्ये पाहायला मिळणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News