एवढं क्रिकेट खेळला तरी धोनीला अक्कल नाही?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

चंदीगड: महेंद्रसिंह धोनी तुम्ही मोठे खेळाडू आहात. तुम्ही एवढं क्रिकेट खेळला आहात, तरीही तुम्हाला आयुष्यात अक्कल नाही की, तुम्ही काय करायला हवं आणि काय नको. तुम्ही दुसऱ्याला सांगता की, जाऊन मोठे फटके मारा. काय युवराजने कधी असं केलं आहे?' माजी क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. याआधीही त्यांनी धोनीला बऱ्याचदा टीकेचं धनी केलं आहे. 

एनएनआयएस स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांनी धोनीवर बरीच टीका केली. मेन्चेस्टर येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना अतिशय अटीतटीच्या सामन्यात धोनीने अर्धशतक झळकावलं पण धोनीने मुद्दाम संथ खेळी केली असा आरोप करत योगराज यांनी धोनीला पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे. 

'धोनीसोबतच युवराजने भारताला किती सामने जिंकून दिले आहेत. हे महाशय बोलतात की, तुम्ही मोठे फटके मारा. अरे... तुला किती हाफ व्हॉली मिळाले. डावखुऱ्या स्पीनरला तू देखील खेळत होता. तू तर लांब-लांब षटकार देखील मारतो. मग तरीही त्यावेळी काय झालं होतं? तू घाबरला होतास का? जास्तीत जास्त काय झालं असतं तू आऊटच झाला असता ना. अरे तर त्याने काय फरक पडला असता? तुम्ही लढताना छातीवर गोळी झेलली तर काही हरकत नाही. पण पाठ दाखवून उंदराप्रमाणे पळून जात केव्हापर्यंत स्वत:चा बचाव कराल?' अशा शब्दात योगराज सिंह यांनी धोनीवर निशाणा साधला. <

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News