भाजप 2024 मध्ये सेनेला एनडीए 'तून हद्दपार करणार ?

सकाळ (यिनबझ)
Friday, 14 June 2019

YSR कॉंग्रेसला जवळ करुन शिवसेनाला 2024 मध्ये एनडीए 'तून हद्दपार ? 

भाजपाची एकुन रणनीती पाहता भाजप 2024 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला एनडीए मध्ये शुन्य करुन एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील राजकारणाला वेगळं वळण लागल्याने भाजपाला देखील YSR कॉंग्रेसचे वेड लागल्याचे चित्र दिसत आहे. हिंदुत्वाचा अजेंन्डा हाती घेऊन लोकसभेत विजय मिळवना-या भाजपने सध्या अल्पसंख्यांकांना जवळ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु केलेत. आध्रं प्रदेशातील लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा वायएसार कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. 

दरम्यान YSR चां खासदारांचा आकडा देखील एनडीए मधील शिवसेने पेक्षा मोठा आहे. मात्र यातील सर्वात मोठा फरक म्हणजे शिवसेना महाराष्ट्रात मोदींच्या हाताखाली आहे, तर YSR यांनी स्वत:च्या बळावर 22 खासदार निवडून आणून TDP आणि भाजपला देखील मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे त्यांचे महत्व वाढलेले असले तरी, भाजप देखील दक्षिण भारतात पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करत असल्याच दिसत आहे. त्यामुळेच काही दिवसांनी कर्नाटकात राजकीय उलथापालथ होऊन भाजप पुन्हा सतेत आल्यास काही हरकत नाही. 

परंतु, YSR हे देखील मोदींचा भक्त असल्याच दाखवत आहेत. त्यातच भाजपा स्वत:च YSR ला लोकसभा उपाध्यक्ष पदाची ऑफर देत आहे. मात्र स्वत:हुन सारखं सारखं त्याच पदाची मागणी करणा-या सेनेकडे मात्र भाजप पुर्णपणे दुर्लक्ष करत असल्याच चित्र दिसत आहे. तसच, भाजपाची एकून रणनीती पाहता भाजप 2024 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला एनडीए मध्ये शुन्य करुन एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच YSR कॉंग्रेसच्या नावाने एनडीमध्ये सोबत घेऊन सेनेला भविष्यात एकाकी पडण्याची रणनीती रचली आहे असंच बोलता येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News