गॅजेटच्या आहारी गेलेल्या तरुणांनसाठी यूथटॉक’ 

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019
  • संपादकीय पानावर व्यक्त होण्यासाठी ‘सकाळ’ने हे चांगले व्यासपीठ दिले आहे.

आजची तरुणाई नवी वाट चोखाळणारी‘यूथटॉक’ सदरातील रोहन पेंडसे याचा लेख (ता. १२) वाचताना मोठी पिढी नक्कीच अंतर्मुख झाली असली पाहिजे. कारण, आजच्या तरुणांच्या वतीने त्याने परखड मते, तसेच काही व्यथा मांडल्या आहेत. युवकांना संपादकीय पानावर व्यक्त होण्यासाठी ‘सकाळ’ने हे चांगले व्यासपीठ दिले आहे.

रोहन म्हणतो, ‘आजचा तरुण उनाड आहे, गॅजेटच्या आहारी गेला आहे, तो समाजापासून दूर चालला आहे, असा ठपका आधीची पिढी ठेवत असते. पण, ते बरोबर नाही. आम्हाला लहानपणापासून नवीन तंत्रज्ञान हाताळायला मिळाल्यामुळे रोजच्या घडीला आम्हाला त्याच्याशी मैत्री करावीच लागते. आम्ही भवितव्य, आपला कल, करिअर यांचा नक्कीच विचार करीत असतो.’ हा लेख आजच्या विचार करणाऱ्या तरुणांचा चेहरा आहे. नुसते तंत्रज्ञान नाही तर कृषी, संशोधन, कला, क्रीडा या क्षेत्रांतही तरुण पिढी नवा मार्ग चोखाळताना दिसतेय.

ही पिढी राजकारण, पर्यावरण या गोष्टींचाही गांभीर्याने विचार करीत असते. त्याशिवाय स्वीडनची छोटी ग्रेटा जागतिक तापमानवाढीच्या विरोधात उभी राहिली नसती. नव्या पिढीला नुसते अर्थार्जन नाही, तर स्वतःचा नैतिक विकास साधणारे मार्गदर्शन आणि नेतृत्वाची आवश्‍यकता व अपेक्षा आहे.
मेघना कुलकर्णी, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News