तरुणांना बेदम मारहाण करुन पाजली लघवी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019
  • खाकी वर्दिला काळीमा फासणारी घटना अलिराजपूर जिल्ह्यातील नानपूर पोलीस ठाणे येथे घडली.
  • पोलिसांनी पाच आदिवासी तरुण आरोपींना अटक करून बेदम मारहाण केली.
  • आरोपींनी पाणी मागितले, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना लघवी पाजले

उत्तर प्रदेश: खाकी वर्दिला काळीमा फासणारी घटना अलिराजपूर जिल्ह्यातील नानपूर पोलीस ठाणे येथे घडली. पोलिसांनी पाच आदिवासी तरुण आरोपींना अटक करून बेदम मारहाण केली. आरोपींनी पाणी मागितले, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना लघवी पाजले.   

पाच आरोपी मधिल एका तरुणाच्या बहिणीसोबत एक करुण छेडछाड करत होता. ते पाहून आरोपी करुणाचा पाठलाग करत होतो. त्यामुळे मदतीसाठी तो तरुण पोलीस ठाण्यात आला. त्या करुणाच्या पाठोपाठ आरोपी पोलिस स्टेशन मध्ये आले आणि पोलिसांवर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांच्या मदतीसाठी धाऊन आलेला तरुण उपस्थित होता. पण त्याने पाच जणांविरोधात तक्रार दिली नाही असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. 

पोलिसांनी आम्हांला अटक करुन बेदम मारहाण केली. आम्ही पोलिसांना पिण्याचे पाणी मागितले. पोलिसांनी मात्र त्यांना लघवी पाजली, असा आरोप या पाच जणांनी केला आहे. याप्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखासह चार पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे पाच आरोपी आदिवासी समाजाचे असून त्यांना अलिराजपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'पोलिसांनी कोठडीत मारहाण केल्याचे आरोप पाच जणांनी केले आहेत. प्रथमदर्शनी त्यात तथ्य आढळून आले आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या शरीरावर जखमाही आढळून आल्या आहेत. या घटनेचा वेगाने तपास करून पोलिसांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे मत अलिराजपूरचे पोलीस अधीक्षक विपूल श्रीवास्तव यांनी एका वृत्तवाहिनीला व्यक्त केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News