"अव्यक्तपणाच्या विळख्यातील तरुणाई...."

प्रसाद अरुण धनवडे, सातारा
Sunday, 7 July 2019

आज-काल व्यसनाधीनता, सोशल मीडिया आणि इतर अनेक कारणांमुळे वहावत निघालेली तथापि बिघडत चाललेली तरुण पिढी सर्वांच्याच दृष्टीस पडते. एकविसाव्या शतकात पदार्पण केलेल्या विकसनशील भारत देशाला महासत्ता करण्यासाठी झगडणारी तरुणाई फार कमी पाहायला मिळते.

दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण वाढती महागाई यातून निर्माण होणारा पैशांचा प्रश्न यामुळे अनेक पालक नोकरी व्यवसाय करतात. यामुळे पालकांचे मुलांवर होणारे दुर्लक्ष आणि संपत चाललेला संवाद हे मुलांची मानसिकता भरकटण्यासाठी कारणीभूत ठरते. 

आज-काल दारू सिगारेट पिणारी अगदी 18 वर्षांखालील मुलेही पाहायला मिळतात. देशाची तरुणाई देशाचे भवितव्य ठरवत असते. तीच विकासासाठी आणि उन्नतीसाठी कारणीभूत असते. भारतासारख्या गौरवशाली आणि दैदीप्यमान इतिहास लाभलेल्या देशातील तरुणाई एवढी का भरकटली असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधताना समोर येणारी गोष्ट म्हणजे "अव्यक्तपणाच्या विळख्यातील तरुणाई".

संवाद हा मन मोकळे होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. मन भरलेलं असेल तर मन भरून कधीच जगता येत नाही. 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन' ही तुकाराम महाराजांची उक्ती सर्वांनीच लक्षात घ्यायला हवी. पालकांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधायला हवा आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून घरात खेळीमेळीचे व आनंददायी वातावरण निर्माण करायला हवे, तरच ही वाहावत जाणारी तरूणाई यशोमार्गावर येईल संवाद हा संकटावर उपाय व अडचणींवर मात करणारा असतो.

संवादातून नेहमीच एक सुवर्ण मार्ग काढता येतो संपत चाललेल्या संवादामुळे घडणाऱ्या अनेक वाईट घटना कानावर पडत असतात अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे मुले मानसिक दबावामुळे अनेक व्यसनांना बळी पडतात हे टाळण्यासाठी संवाद ही एकविसाव्या शतकाची अतिशय महत्त्वाची गरज आहे. ज्यामुळे ही तरुणाई सुमार्गावर येईल आणि त्यांच्या मनावर संस्कारांची रुजवण होईल ज्ञानाने संपन्न होणाऱ्या तरुणाईला संस्कार हे गरजेचे असतात संस्कारांशी वाय ज्ञानाला किंमत प्राप्त होत नाही जर तरुणाई अव्यक्त पणाच्या विळख्यातून बाहेर आली तर ती नक्कीच ज्ञानसंपन्न आणि विवेकनिष्ठ होईल आणि माझा भारत पुन्हा एकदा अभिमानाने आणि प्रभावीपणे विजय शिखरावर पोहोचेल यात शंका नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News