"यूथ समीट 2019'चे नगरमध्ये शानदार उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

नगर : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या "यूथ समीट'मध्ये सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना करिअरसाठी नवे मार्ग सापडतील. "सकाळ'ने विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

त्याचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटावा. मात्र, त्यासोबत भावी आयुष्यात उपयोगी ठरेल, असे काही तरी येथून नक्कीच घेऊन जावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी आज विद्यार्थ्यांना केले. 

नगर : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या "यूथ समीट'मध्ये सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना करिअरसाठी नवे मार्ग सापडतील. "सकाळ'ने विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

त्याचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटावा. मात्र, त्यासोबत भावी आयुष्यात उपयोगी ठरेल, असे काही तरी येथून नक्कीच घेऊन जावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी आज विद्यार्थ्यांना केले. 

डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या व्यासपीठाच्या पुढाकाराने नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यिन समर यूथ समीटचे उद्‌घाटन आज आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा व्याख्याते गणेश शिंदे, जेएसपीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डी. डी. शहा, सृजन कॉलेजचे संचालक संतोष रासकर, नाट्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, अभियंता-गायक अजय दगडे, प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे, राष्ट्रीय खेळाडू श्‍वेता गवळी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

जगताप म्हणाले, ""कोणत्याही महत्त्वाचा विषय मांडण्यासाठी चांगले व्यासपीठ लागते. तरुणाईसाठी "सकाळ'तर्फे ते उपलब्ध करून देण्यात आले. या समीटमध्ये सहभागी होणाऱ्यांचे संघटनकौशल्य वाढीस लागेल. बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सलग दोन दिवसांचे हे शिबिर आहे.

त्यात तरुणाईच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासात "समीट' मोलाची भूमिका बजावेल, यात शंका नाही. "यिन'तर्फे विद्यार्थ्यांना राजकारणाचाही अभ्यास व्हावा, म्हणून मंत्रिमंडळाची संकल्पना राबविण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून "यिन'तर्फे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ निवडले जाते. त्यातून खूप मोठी शिकवण मिळते. भविष्यात यातूनच एखाद्या नव्या नेत्याचा जन्म होईल. त्यामुळे शिबिरात सहभागी होण्याचा आनंद लुटावाच; त्यासोबत नवे काय शिकायला मिळते, तेदेखील पाहावे.'' 

गणेश शिंदे म्हणाले, ""सध्याच्या युगात कसे बोलावे यापेक्षा काय बोलावे, हे आता अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याला काय बोलायचे हे समजले, त्याचे नक्कीच करिअर होईल. त्यातही आता कुणालाही भूतकाळाशी विसंगत बोलता येणार नाही; अन्यथा "लाव तो व्हिडिओ' अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही.'' प्राचार्य शहा, प्राचार्य डॉ. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

"सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी प्रास्ताविक केले. यूथ समीटमध्ये सलग दोन दिवस चांगल्या विचारांचे मंथन होईल. त्यातून विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी नक्कीच चांगली शिदोरी मिळेल. जीवनाची नवी सुरवातही करण्यास संधी मिळेल, अशी भूमिका डॉ. बोठे पाटील यांनी मांडली. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. "यिन'चे महाराष्ट्राचे हेड तेजस गुजराथी यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News