तरुणांनी राज्याच्या व देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019
  • विवेक कोकरे; ‘यिन’तर्फे मार्गदर्शन, अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आदर्श घ्या

राजापूर - आपल्या अंतर्मनाचा आवाज ओळखून त्या आवाजाचा वेध घेत, स्वतःचा सर्वांगीण विकास करताना युवकांनी गावच्या, राज्याच्या व देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन युवा वक्ते विवेक कोकरे यांनी केले. त्यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट मांडत त्यांचा आदर्श मानण्याचा मौलिक सल्लाही दिला.

‘दैनिक सकाळ’तर्फे तरुणांसाठी राबविल्या जात असलेल्या ‘यिन’ प्रोग्रामअंतर्गंत आज शहरातील राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर कोकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने अध्यक्ष होते. कोकरे म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकासासाठी जास्तीत जास्त वाचनाची आवश्‍यकता आहे. त्यातच, प्रत्येकाने आपल्या जीवनात वाचन संस्कृती रुजविणे गरजेचे आहे.

त्याचवेळी आपल्या आयुष्यातील भूतकाळाची पानंही चाळवीत. त्यातून, यशाचा मार्ग शोधताना अंतर्मनाचा वेध घ्या. स्वतःला ओळखा व इतिहास घडवा. इंटरनेटच्या मायाजालाचा स्व-विकासासह देशविकासासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून उपयोग करण्याचा त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.  वाचन-प्रेरणा दिनानिमित्ताने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News