तरुणाईचं सेल्फी विथ मतदान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019
  • पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या तरुणाईमध्ये सेल्फीची मोठी क्रेझ होती.
     

मुंबई: काल संपूर्ण देशभरात राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान होते. सर्व जनतेने मतदान केले. त्यात तरुण-तरुणींचा देखील समावेश होता. विशेषत: पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या तरुणाईमध्ये सेल्फीची मोठी क्रेझ होती. मतदान केल्यानंतर तरुण-तरुणींने बोटावर शाई लावलेला फोटो मतदान केले असे सोशल मीडियावर अपलोड करुन सांगितले.

वोट फॉर डमोक्रसी, मी मतदान केले, तुम्हीसुद्धा करा, मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावा असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. राज्यातील मतदानाचा टक्‍का वाढावा, याकरिता निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविले होते. त्यामध्ये प्रभातफेरी, पथनाट्य, नवमतदारांसाठी महाविद्यालयांमध्ये व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. याला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमुळे दिसून आले.

त्यामुळे फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्‌विटर हा सोशल मीडिया दिवसभर मतदानाच्या फोटोंनी सजला होता. सर्व अभिनेत्र्यांनी देखील मतदान केल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. वैयक्‍तिक फोटोंबरोबरच कुटुंबासोबत, मित्र, मैत्रिणींसोबत मतदानानंतरचे काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची चढाओढ तरुणाईमध्ये लागली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News