पैनगंगेच्या पूरातून युवकांनी वाचविले चौघांचे प्राण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

बुलडाणा: गेल्या चार दिवसांपासून बुलडाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून, आतापर्यंत तालुक्यात 137.6 मिमी पाऊस पडला असून, 28 जून सकाळी 8 वाजेपर्यंत 14.7 मिमी इतका पाऊस पडला आहे. दरम्यान, देऊळघाट नजीक पैनगंगा नदीला आलेल्या चौथ्या दिवशी पूरामध्ये नदीपात्रात टॅक्टर अडकल्यामुळे त्यामध्ये बसलेल्या चौघांचा जीव धोक्यात आला होता.

बुलडाणा: गेल्या चार दिवसांपासून बुलडाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून, आतापर्यंत तालुक्यात 137.6 मिमी पाऊस पडला असून, 28 जून सकाळी 8 वाजेपर्यंत 14.7 मिमी इतका पाऊस पडला आहे. दरम्यान, देऊळघाट नजीक पैनगंगा नदीला आलेल्या चौथ्या दिवशी पूरामध्ये नदीपात्रात टॅक्टर अडकल्यामुळे त्यामध्ये बसलेल्या चौघांचा जीव धोक्यात आला होता.

परंतु, दोरीच्या साहाय्याने काही युवकांनी जिवाची पर्वा न करता त्यांना मदत करत नदीच्या पात्रातून बाहेर काढले.
परिसरात गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस पडत असल्यामुळे देऊळघाट, दत्तपुर, पाडळी, पळसखेड़, मढ़, चौथा या भागात जोरद पाऊस झाल्याने या पाच दिवसात पैनगंगा नदीला चौथ्या दिवशी पूर आलेला असून देऊळघाटच्या पुलाला लागून पाणी वाहत होते. दरम्यान, नदीच्या लगत असलेल्या नाल्याला आलेल्या पुराच्या घेरावात एक ट्रॅक्टरसह 4 व्यक्ती अडकत ते सर्व नदीच्या पात्रात पोचत पुरात अडकले होते. यावेळी येथील काही युवकांनी जिवाची पर्वा न करता नदीपात्रातून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 

28 जूनला दुपारी आलेल्या दमदार पावसामुळे काही वेळातच तालुक्यातील देऊळघाट येथून वाहणार्‍या पैनगंगा नदीला पूर आला. या पुरात गावातील विजय जाधव, संकेत जाधव, कविता जाधव तसेच अर्जुन जाधव हे शेतातील काम आटोपून गावाकडे टॅक्टरने परत येत होते. त्यावेळी त्यांनी पैनगंगा नदीला पार केल्यानंतर एका नाल्यामधून जात असता नाल्याला मोठ्याप्रमाणात पाण्याचा लोंढा आल्यामुळे टॅक्टर सदर पाण्यापुढे मागे सरकत केले. 

टॅक्टरच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे ते बंद पडले. चौघेही टॅक्टरसह नदीपात्रात गेले. याच वेळी नदीला पूर आला होता. पूरामुळे पाण्याने त्यांना घेराव टाकला. त्यांनी नदीकाठी असलेल्या नागरिकांना मदतीसाठी आवाज देण्यास सुरवात केली. यावेळी देऊळघाट येऊन शुक्रवारी नमाज वाचून येत असताना त्यांना सदर परिस्थिती दिसून आली. यावेळी त्यांनी कोणताही विचार न करता जिवाची बाजी लावत दोरीच्या साहाय्याने टॅक्टरवर असलेल्या चौघांना बाहेर काढले. सुदैवाने परिस्थिती आणि वेळेवर युवकांनी मदत केल्यामुळे चौघांचे प्राण वाचले. 

एकीकडे देशात मोब्लिंचिगच्या नावावर जातीय भेदभाव निर्माण करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जिवावर बेतणार्‍या घटनेतून चौघांना देऊळघाट येथील मुस्लिम युवक कदीर खान इक्बाल खान, अब्दुल अतीक अब्दुल मजीद, फज़ान खान याकूब खान, शेख राजिक, अंसार शाह, शेख वसीम तथा शेख सुलतान यांनी बाहेर काढत एकतेचा आणि जातीयतेढ निर्माण करणार्‍यावर चपराक लावण्याचे कार्य केले आहे. या युवकांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांना प्रशासनाने सन्मान करण्याची मागणी होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News