युवकांची प्रेरणा श्रीकांत जाधव

अविनाश पाटील
Wednesday, 17 July 2019

31 डिसेंबर म्हणजेच थर्टी फर्स्ट निमित्त राबवण्यात आलेला 'द' दारूचा नव्हे तर 'द' दुधाचा दारू नको दूध प्या हा व्यसनमुक्तीचा संदेश देणारा उपक्रम हा उपक्रम करायचे ठरवले.

आजतागायत झालेल्या वाढदिवसांपैकी अतिशय विशेष वाढदिवस म्हणजे आमच्या लाडक्या मित्र श्रीकांत जाधव यांचा. जाधव घराण्यामध्ये जन्म झाला आणि संघर्षाची यशोगाथा सुरू झाली. संघर्ष तसा जन्मतःच रक्तात भिनलेले आहे, पण हा त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात असणारा होता. समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ प्रकर्षांने जाणवते. कमी वयात महाराष्ट्र भर आपल्या विवेकी विचारांची ख्याती पोहचविणारे संघर्ष वीर, त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय चळवळीत कामगिरीने सगळ्यांशी असलेली निखळ मैत्री सगळ्यांना परिचयाचीच. 

खर तर जी लोकं समाजमान्य असतात ती राजमान्य असतातच असे नाही आणि जी राजमान्य असतात ती समाजमान्य असतातच असे नाही, पण श्रीकांत जाधव हे समाजमान्य आणि राजमान्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा उदगीर मध्ये असणाऱ्या उदयगिरी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि त्यांची खरी शैक्षणिक चळवळ सुरू झाली. कॉलेजच्या मित्रांच्या सहकार्याने ते विद्यापीठाला पण धारेवर धरले आणि त्यानंतर त्यांचा तालुका स्तरावर ओळख वाढीस लागली आणि अनेक समजकार्याची दखल पुन्हा यिनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला झाली. 

ते यिनच्या दुग्धविकास मंत्री आणि लातूर च्या पालकमंत्री या पदावर विराजमान झाले. त्यांच्या कार्याला गगनभरारी मिळाली. दुष्काळाशी सामना करणाऱ्या गावकऱ्यांना पाणी मिळवून देणं असेल  किंवा अशी अनेक कामे त्यांनी पूर्णत्वास नेली. आज अनेक लोक त्यांना प्रेरणास्थान मानतात. यामागे कारण ही तसेच आहे त्यांची आजपर्यंत केलेली कमी वयातील सामाजिक कार्याची आढावा घेतला तर ते कोणताही युवक त्यांना आदर्श मानेल माझी व त्यांची ओळख ही एका शैक्षणिक कार्यक्रमात झाली त्यांच्या पटकन पुढच्याला आपलंसं करणाऱ्या सवयीमुळे मी केंव्हा त्यांचा जवळचा मित्र झालो हे माझं मलाच कळलं नाही. 

माझी व त्यांची जेंव्हा ओळख झाली तेंव्हा ते 'यिन' प्रतिनिधी होते. पुढे काही दिवसांनी त्यांची 'यिन' मंत्रिमंडळात नियुक्ती झाली आणि तेंव्हापासून तर त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात मला घेतल्याशिवाय त्यांनी तो पूर्ण केलाच नाही. आम्ही अनेक सामाजिक उपक्रम घेतले, त्यात स्वच्छता मोहीम असो की युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर असो की शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा असो अश्या अनेक सामाजिक उपक्रमात मला त्यांच्यासोबत राहून बरच काही शिकता आलं. त्यांच्या या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या वृत्तीमुळे मला सुद्धा माझा वाढदिवस अंध व अपंग विद्यार्थ्यांसोबत करण्याची प्रेरणा मिळाली.

तो वाढदिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण राहील अश्या पध्दतीने वाढदिवस साजरा केल्यामुळे मला सुध्दा आत्मिक समाधान मिळाले. त्यांच्यासोबत काम करत असताना मला आलेला एक अनुभव याठिकाणी सांगावासा वाटतो आम्ही 31 डिसेंबर म्हणजेच थर्टी फर्स्ट निमित्त राबवण्यात आलेला 'द' दारूचा नव्हे तर 'द' दुधाचा दारू नको दूध प्या हा व्यसनमुक्तीचा संदेश देणारा उपक्रम हा उपक्रम करायचे ठरवले. तेंव्हा दूध कुठून आणायचे हा प्रश्न पडला तेंव्हा पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ. अनिल भिकाने यांनी त्यांच्या संपर्कातील परिसरातील काही शेतकऱ्यांना शब्द टाकला, या उपक्रमाविषयी सांगितले तेंव्हा त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी वीस वीस लिटर दुध देऊन या उपक्रमाला पाठिंबा दिला.

तब्बल 150 लिटर दुध सर्व शेतकऱ्यांनी मिळून दिल व कार्यक्रमाला देखील उपस्थित राहून आमचं मनोबल वाढवलं. एवढंच नसून कार्यक्रम पाहून या सर्व शेतकऱ्यांनी पुढील वर्षी 500 लिटर दुध वाटप करू व हे सर्व 500 लिटर दुध आम्ही सर्व शेतकरी मिळून या आपल्या उपक्रमाला देऊ अशी ग्वाही दिली. या सर्व शेतकऱ्यांनी दिलेली साथ पाहता आपण जर एखादं चांगलं कार्य करत असलो तर त्या कार्याला अनेक दानशूर व्यक्ती मदत करतात व पाठिंबा देतात. श्रीकांत जाधव यांच्यासोबत राहून या उपक्रमातून शिकता आलं. त्यांच्याविषयी लिहायल गेलं तर वेळसुध्दा अपुरा पडेल म्हणून इथेच थांबतो व त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणावसं वाटत..

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही 
 करीत रहावे !
कधी वळून पाहता आमची 
शुभेच्छा स्मरावी !
"तुमच्या इच्छा आकांक्षांचा 
वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही 
मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो 
 ही इच्छा !

       

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News