तरुणाईचे डिजिटलायझेशन..!

गजेंद्र बडे
Friday, 25 January 2019

'मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर, मी हा देश पूर्णपणे बदलून टाकेल,'' हे स्वामी विवेकानंदांनी भारतातील युवकांबाबत व्यक्त केलेले मत आहे. जे आजही तंतोतंत खरे ठरते आहे. देश असो, राज्य असो, विभाग, जिल्हा असो की शहर या सर्वांच्या विकासासाठी युवकांचा पुढाकार असलाच पाहिजे. युवकांशिवाय विकास होऊच शकत नाही, हेच स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेल्या मताद्वारे प्रदर्शित होत आहे. पुणे शहर किंवा जिल्हाही याला अपवाद कसा असेल. पुणे हे तर चळवळींचे केंद्र आहे.

'मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर, मी हा देश पूर्णपणे बदलून टाकेल,'' हे स्वामी विवेकानंदांनी भारतातील युवकांबाबत व्यक्त केलेले मत आहे. जे आजही तंतोतंत खरे ठरते आहे. देश असो, राज्य असो, विभाग, जिल्हा असो की शहर या सर्वांच्या विकासासाठी युवकांचा पुढाकार असलाच पाहिजे. युवकांशिवाय विकास होऊच शकत नाही, हेच स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेल्या मताद्वारे प्रदर्शित होत आहे. पुणे शहर किंवा जिल्हाही याला अपवाद कसा असेल. पुणे हे तर चळवळींचे केंद्र आहे. देशातील अनेक सामाजिक चळवळींची सुरवात पुण्यातून झाल्याचा आणि तीही युवकांनीच सुरवात केल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. अगदी पिढ्यान्‌पिढ्यांपासून पुण्यातील युवक हा सामाजिक विकासात योगदान देणारा आहे. यातूनच 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीचा जन्म झाला आहे. याच तरुणांना मोठ्या संख्येने संधी उपलब्ध करून दिल्यास या आधुनिक डिजिटल युगात नवी क्रांती घडेल यात शंका नाही.

पुणे शहरातील आजची तरुण पिढी समजून घेणे तसे फारच कठीण होऊन बसले आहे. पूर्वी देश आणि सामाजिक विकासाच्या ध्येयाने काम करणारा तरुण वर्ग आता मात्र स्वार्थी, मतलबी आणि समाजाच्याऐवजी स्वःहिताला प्राधान्य देऊ लागला आहे. त्यातूनच येथील युवकांनी 'आम्ही'ची जागा आता "मी'ने घेतल्याचे दिसते आहे. पुण्यातील तरुणांची आजची पिढी ही तंत्रज्ञानाने झपाटलेली, तीक्ष्ण बुद्दीमत्ता आणि डोक्‍याने शार्प अशी आहे. त्यामुळे ते भावनांचा विचार न करता प्रॅक्‍टिकली जगण्यास प्राधान्य देऊ लागली आहेत. त्यासाठी सामाजिक कारणेही जबाबदार आहेत. कारण आजच्या युवकाचा कल हा रोजगार, करिअर, पैसा, प्रेम, लग्न आणि लवकरात सेटल होण्याकडे वाढला असल्याचे दिसू लागले आहे. मात्र रोजगारात झालेली घट आणि त्यातूनच बेरोजगारीत झालेली प्रचंड वाढ, या चिंतेने युवक वर्ग ग्रासला गेला आहे. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. याला रोजगार किंवा नोकरी मिळविण्याचे क्षेत्रही अपवाद नाही. परिणामी या स्पर्धेच्या ओझ्याखाली पुण्यातील युवक दबला जाऊ लागला आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा व्यवहारात वाढलेला कमालीचा वापर हेच मुख्य कारण ठरू लागले आहे. परिणामी दोन-तीन दशकांपूर्वी शांतपणे जीवन जगणारे युवक आता मात्र खूपच जागरूकपणे जगू लागले आहेत. याचे श्रेय हे माहितीच्या प्रचंड साठ्याला जाते आहे. त्यातूनच युवकांवर होणाऱ्या माहितीच्या भडिमारामुळे तर भरकटले जाऊ लागले नाहीत ना, अशीही शंका निर्माण होऊ लागली आहे. हि तरुणाई डिजिटलायझेशनच्या ओघात जात आहे.

करियरच्या मागे धावणारा युवकांचा एक वेगळा वर्गही पुण्यात आहे. खरं तर हा युवक वर्ग हा पुणे शहराबाहेरील आहे. तो राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुणे शहरात आलेला आहे. युवकांमध्ये इंटरनेट वापराचे मोठे फॅड आले आहे. शिवाय व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, स्काईप, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, ऑनलाइन शॉपिंग, गेमींग यासारख्या सामाजिक माध्यमांनी युवकांच्या मनावर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे आजचा युवक हा सामाजिक माध्यमांच्या चक्रव्यूहात पुरता अडकला गेला आहे. यातूनच तरुणांना इंटरनेटच्या आणखी एका नव्याच व्यसनाने जखडले आहे. यामुळे तरुणांमध्ये हिंसकता आणि नैराश्‍याची भावना वाढीस लागू लागली आहे. याउलट शहरातील युवकांना भ्रष्टाचार, गैरव्यवहार नको आहे. कामांमध्ये पारदर्शकता असावी, यावर अनेक युवकांचे एकमत आहे. मात्र नोकरी मिळण्यास लागणारा विलंबाने काही तरुण नैराश्‍याच्या गर्तेतही अडकू लागले आहेत. यातून बाहेर पाडण्यासाठी तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News