आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावली युवा समिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी युवा समितीच्यावतीने साई भवन येथील आवारा केंद्रात जाऊन बिस्किटे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

बेळगाव: शहरात सुरू असलेल्या मूसळधार पावसामुळे अनेकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच नागरिकांना महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या आवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी युवा समितीच्यावतीने साई भवन येथील आवारा केंद्रात जाऊन बिस्किटे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी वातावरणात झालेल्या बदलामुळे आवारा केंद्रातील अनेकजण आजारी असल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने सुविधा पुरविण्याची मागणी केली यावेळी अधिकारी व डॉक्टरनी जे लोक आजारी आहेत त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. तसेच गरज पडल्यास रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

पावसामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्ते माहिती घेऊन मदत पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत पडली आहेत. युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सचिव  श्रीकांत कदम, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सूरज कुडूचकर, मिलिंद देसाई, किरण हुद्दार, संध्या पाटील, सचिन केळवेकर, अहमद रश्मी, अभिषेक काकतीकर, श्री काकतीकर आदी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News