तुझा स्पर्श

स्वाती
Tuesday, 4 June 2019

ते चांदण गगनी लखलखते
भान हरपून सख्या मी जाते,

काय असेल ती रात्र
धुंद गंध तुझा सहवास,
मी सैल जराशी होते
गुंतून मुक्त हलकेच होते...

ते चांदण गगनी लखलखते
भान हरपून सख्या मी जाते,
तू कवेत अलवार मज घेता 
चंद्र ही आकाशी खुलतो तेव्हा...

निल अंबरी झोका झुलतो
तो बहर प्रीतीचा फुलतो,
तुझी साथ अबोल मजला
तो स्पर्श होईल मोहक असा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News