नात... तुमचं, आमचं, हृदयाचं आणि प्रेमाच्या पलिकडचं

साक्षी रामदास साळुंखे, सातारा
Sunday, 7 July 2019

नातं कोणतही असू द्या त्याची सुरुवात होते, विश्वासाच्या आधारावर! मग ते मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चालू असतं अगदी सारखा फोन, मॅसेज वगैरे! 

नातं कोणतही असू द्या त्याची सुरुवात होते, विश्वासाच्या आधारावर! मग ते मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चालू असतं अगदी सारखा फोन, मॅसेज वगैरे! 

फक्त वेळ यावी ती एका गैरसमजाची आणि सगळं काही विस्कळीत, नाही का? गैरसमज असो वा भांडण, आत्ता कसं झालयं माहितीये का? Just formality म्हणून समजूत काढू, आतून तर भावना तशा असतील का नाही माहित नाही; पण एकाने दुसऱ्याला समजून घेणं म्हणजे अगदी व्यवहार केल्यासारखा  केला जातो म्हणजे कधी कधी घेतलंही जातं समजून; पण प्रत्येक वेळी "मीच का समजून घ्यायचं?" या प्रश्नावर सारा खेळ पलटला जातो.

अरे, भांडणं तर त्या राधा-कृष्णाची पण व्हायची, काय त्यांनी लगेच भांडण नाही सहन झालं म्हणून breakup ची भूमिका घेतली का? कधीच नाही! राधेनेही त्या कृष्णाचा "नटखटपणा" तेवढयाच ताकदीने झेलला, जसा त्या कृष्णाने तिचा "चिडचिडेपणा"

नातं हे एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे असतं जर एकाने विस्कटलं तर दुसरयाने ते धागा बनून गुंफायचं असतं. अन् त्यात कहला आलायं हो "मी" पणा! कुणीतरी म्हणलेलं, "जहाँ रिश्तों में अहम आ जाता है, वहाँ रिश्तें दिल से नहीं, बल्कि दिमाख से निभाये जाते है...!"

आता, हल्लीचीच पोरं पहा ना, ego तर कुट्टून भरलेला असतो! जर कुठली इच्छा नाही पूर्ण झाली की लगेच भूमिका आणि वरून एवढं, आता मी तिच्यासाठी एवढं करतो मग तिने समजून नको का घ्यायला किंवा उलटं घ्या ती म्हणते, मी जेवढं केलयं ते दुसरं कुणीही करू शकणार नाही. अरे दुसरं कुणी करु शकणार नाही म्हणून तर तुमचं नातं तयार झालं ना!
 
नवरा - बायकोचं पण तसचं असतं, अपेक्षा ठेवल्या जातात एकमेकांकडून, पण जर त्या पूर्ण नाही झाल्या तर मग हजारो नाती उध्वस्त! जेव्हा आपण नाती जोडतो, तेव्हा ती अगदी सहज रेशमी बंधाप्रमाणे जोडली जातात, पण जसं जसं तुम्ही त्यात खोलवर जालं तसं तुम्हाला त्यातील कसोट्या ही पार कराव्या लागतीलच की!

माणसानं नेहमी नातं कसं टिकेल याहीपेक्षा ते किती सुंदररित्या निभावलं जाईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, नाही का? कारण ते टिकवण्यापेक्षा, ते निभावण्यात जास्त कस लागतो. करायचं कधी-कधी स्वतःचं मन मोठं, घ्यायचं समजून दुसरयाला आणि कधी समजूनही सांगायचं! माफी मागण्याचा अर्थ असा नव्हे की, दरवेळी तुम्ही चुकीचे असता; त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या अहंकारापेक्षा तुमचं नातं जास्त महत्वाचं वाटतं, नाही का? 

हे जीवनाचं जे व्यासपीठ आहे, त्यावर नेहमी असं नातं जोडलं पाहीजे, की जे आपण गेल्यावरही अबाधित राहिल आणि जर आपण प्रत्येक वेळी नात्यात आपला अहंकार आणत असू तर कसं ते टिकणार? म्हणून आपण ठरवायचं की, "ego" की    "relationship" काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे? कारण; मोडणं कितीही सोप्पं असलं तरी जोडणं तेवढंच कठीण असतं!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News