असा योगा करणे तरुणीला पडले महागात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019

मेक्सिको: योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि यागाचे महत्व कळाले. सामान्य माणसापासून सुप्रसिद्ध कलाकारापर्यंत योगा करण्याची जणू क्रेझ निर्माण झाली आहे. यात तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

मेक्सिको शहरातील एका तरुणीने घराच्या बाल्कनीत योगा करत असताना तीचा तोल गेला आणि ती सहाव्या माळ्यावरून ८० फूट खाली कोसळली. टेरजा असं या तरुणीचं नाव असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.  

तरुणी योगा करत असताना काही वेळा पुर्वी तीच्या मित्राने एक फोटो काढला होता. तो फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला होत आहे. या फोटोत ती बाल्कनीला लटकत असल्याचं दिसत आहे.

ही घटना मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान घडली. तिच्यावर ११ तास सर्जरी करण्यात आली. गुडघे आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली असून सर्जरी करुन प्रत्यारोपण करावं लागणार आहे. यामुळे तरुणी पुढील तीन वर्ष चालू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरुणी ८० फूट खाली कोसळल्याने जवळपास ११० हाडं मोडली आहेत. तरुणीचे हात, पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

तरुणीच्या उपचारासाठी मोठी रक्कम लागणार आहे. रक्कम गोळा करण्यासाठी तरुणीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले आहे. आवाहनाला प्रतिसाद देत १०० जणांनी मदत केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News