अन् पैजेसाठी तरुणीने चालविली विवस्त्र होऊन गाडी  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • बेळगाव शहरात पैज हरल्यामुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थीनींला चक्‍क रस्त्यावरुन वाहन चालवावे लागले.
  • याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शहरवाशीयांमधुन तिव्र प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत.

बेळगाव: आजपर्यंतच्या इतिहासात अनेक प्रकारच्या पैज लावण्यात आल्याची चर्चा नेहमीच ऐकावयास मिळत असते. मात्र हरल्यास विवस्त्र होऊन वाहन चालविण्याची पैज काही वेगळीच. परंतु, बेळगाव शहरात पैज हरल्यामुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थीनींला चक्‍क रस्त्यावरुन वाहन चालवावे लागले आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शहरवाशीयांमधुन तिव्र प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. तसेच असे प्रकार करणाऱ्या महाविद्यालयीन युवक- युवतींचा शोध घेऊन पोलीसांनी कारवाई करणे आवश्‍यक आहे. 

दोन दिवसांपुर्वी शहरातील नेहमी गजबजलेल्या क्‍बल रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये मौजमस्ती करीत असताना पैज लावण्यात आली. मात्र पैज हरल्यास विवस्त्र होऊन वाहन चालविण्याची अट होती. तरीही पैज लावण्यात आली आणि युवतीने पैज हरल्यानंतर ठरल्याप्रमाणे विवस्त्र होऊन दुचाकी चालविण्याचा आग्रह तिच्यावर करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच एक युवती विवस्त्र होऊन वाहन चालवित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शहरात एकच चर्चा सुरु झाली आहे. 

बेळगाव हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथील शिक्षण संस्थामध्ये शिक्षणासाठी इतर राज्यातुन येणाऱ्या युवक, युवतींची संख्या वाढली आहे. या युवक युवती रात्री उशीरापर्यंत पाट्या करीत असतात. त्यामुळे युवक-युवतींच्या हुल्लडबाजीचा त्रास अनेकदा बेळगावकरांना करावा लागत असतो. 

रोडवरुन इतर वाहनांची वर्दळ सुरु असताना देखिल युवती सुरुवातीला युवकाच्या दुचाकीवर विवस्त्र होऊन मागे बसते तसेच युवकाने दुचाकी थांबविल्यानंतर त्याच अवस्थेत स्वत: वाहन चालविते असे व्हिडीओत स्पष्ट दिसुन येत आहे. त्यामुळे अशा प्रवृतीना आळा घालण्यासाठी पोलीसांनी विवस्त्र होऊन वाहन चालविणाऱ्या युवतीची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे. अन्यथा गरीबांचे महाबळेश्‍वर अशी ओळख असलेल्या सुसंस्कृत बेळगावात असे प्रकार वाढीस लागण्याची शक्‍यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News