तरुणांना मिळणार येथे रोजगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 September 2019
  • बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात सोमवारी (ता. 16) हा मेळावा होणार आहे.

बारामती: रोजगाराची संधी तरुणाईला उपलब्ध व्हावी या उद्देशाने बारामतीत सोमवारी (ता.16) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकीत तीसहून अधिक कंपन्यांमध्ये कर्मचारी भरतीच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा महत्वाचा ठरणार आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पार्थ पवार यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

येथील विद्या प्रतिष्ठानच्या सहकार्याने पुण्यातील नामांकीत मॅन युनायटेड ही कंपनी या रोजगार मेळाव्यासाठी सहकार्य करणार आहे. रोजगाराच्या चांगल्या संधी बारामती परिसरातील युवकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात सोमवारी (ता. 16) हा मेळावा होणार आहे. सकाळी आठ ते दहा या वेळेत नोंदणी करायची असून सकाळी साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत युवकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या रोजगार मेळाव्यात तीस कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पार्थ पवार यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. 

दहावी पास, नापास यासह डिप्लोमा, डिग्री, आयटीआय असलेल्या युवक- युवतींची या रोजगार मेळाव्यात निवड केली जाणार आहे. मुलाखतीस येताना इच्छुकांनी आपली सर्व ओरिजनल कागदपत्रांसह झेरॉक्स, आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी 9096005439, 8788638448 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News