आरक्षणावर नको, गुणवत्तेवर तरुणांना हवी संधी

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

रत्नागिरी - सामान्य जनतेला सरकार आपलेसे वाटले पाहिजे. ग्रामीण भागाचा पायाभूत विकास साधावा. ग्रामीण तरुणांना नव्या डिजिटल क्रांतीची माहिती देणाऱ्या उमेदवाराला आम्ही साथ देऊ, असे विधार्थी  आरक्षण  

रत्नागिरी - सामान्य जनतेला सरकार आपलेसे वाटले पाहिजे. ग्रामीण भागाचा पायाभूत विकास साधावा. ग्रामीण तरुणांना नव्या डिजिटल क्रांतीची माहिती देणाऱ्या उमेदवाराला आम्ही साथ देऊ, असे विधार्थी  आरक्षण  

गुणवत्ता असूनही त्यांना उपेक्षित राहावे लागते, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्‍त केली. समान संधी देण्यासाठी येणाऱ्या सरकारने गरीब, श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी. ही तरतूद आरक्षणाच्या कुबड्या न ठेवता गुणवत्तेवर आधारितच असावी. प्रशासकीय भ्रष्टाचारामुळे आज ग्रामीण भागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. चांगले रस्ते नाहीत. विजेची समस्या आहे. दळणवळणाची साधने नाहीत. गुणवत्ता आहे; पण बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती 

गावात पोचवणारे प्रतिनिधी नाहीच. काळा पैसा, महिलांचे संरक्षण, शैक्षणिक क्षेत्रातील संधी, रोजगार या विषयावर कणकवली शहर आणि परिसरातील मुलांनी रोखठोक मते मांडली. परिसंवादात ‘सकाळ’चे बातमीदार तुषार सावंत, रवींद्र चव्हाण आणि कणकवली महाविद्यालयाचे प्रो. सत्यवान राणे सहभागी झाले. 

निवडून येणाऱ्या उमेदवाराने विकासाच्या कामगिरीवर भर द्यावा आणि युवक वर्गापर्यंत शासकीय योजना पोचण्यासाठी प्रयत्न करावेत. गुणवत्ता ओळखून शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. 

लोकप्रतिनिधी निवडून येतात; मात्र पाच वर्षांनंतर त्यांच्या संपत्तीत बदल होतो. गावच्या सरपंचांचीही अशीच स्थिती आहे. विकासकामे होत नाहीत. मात्र श्रीमंत होणाऱ्या लोकप्रतिनिधींची चौकशी होण्याची गरज आहे. -  तेजश्री आचरेकर

शिक्षण क्षेत्रात सुविधा मिळायला हव्यात. शिक्षण शुल्काच्या आधारावर होणारा भ्रष्टाचार थांबवावा. - शैलेश गावडे, यिन अध्यक्ष

गरजू विद्यार्थ्यांसाठी नवीन सवलती उपलब्ध कराव्यात. शिष्यवृत्ती जातीव्यवस्थेवर न ठेवता गुणवत्तेवर आधारित ठेवावी. - पूजा गणपत खरात (प्रथम वर्ष वाणिज्य, कणकवली कॉलेज)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News