यवतमाळमध्ये ‘एक व्यक्ती, एक झाड’ उपक्रमाला तरुणांचा प्रतिसाद

समीर मगरे
Sunday, 7 July 2019

यवतमाळ - आज झाडांची कटाई मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे व ते जगवणे होय. यासाठी शहरातील राजे बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला असून, ‘एक व्यक्ती, एक झाड‘ हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना वृक्ष दिला जात आहे. त्यामुळे वृक्षारोपणाच्या या चळवळीत नागरिकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात झाला आहे.

प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व ते जगवावीत, वृक्षलागवड ही केवळ शासकीय योजना नाही, तर समाजातील प्रत्येकाने यासाठी सहकार्य करावे. आपल्या पूर्वजांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले आहे. वृक्षसंवर्धनाची हा दिवा सतत तेवत ठेवून वृक्षलावगडीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, वृक्षारोपण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 

वृक्षारोपणातून हिरवागार झालेला परिसर मनाला आनंद देतो. सामाजिक व राष्ट्रीय भावनेतून वृक्षारोपण व संवर्धनाच्या कार्यात सर्वांनी भाग घ्यावा, यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावावे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील टिळकवाडी परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रोज दहा झाडे देण्यात येत आहेत. या उपक्रमात नागरिक सहभाग घेऊन वृक्ष लावत आहेत. या उपक्रमात राजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अंकुश पांडे, सचिव कुणाल खोडवे, मंगेश धोटे, अमित क्षीरसागर, निरंजन निकडे यांनी पुढाकार घेतला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News