यवतमाळ विधानसभेत दिग्गजांसोबतच या तरुणांचीही कुरूक्षेत्रात उतरण्याची तयारी!

समीर मगरे
Thursday, 13 June 2019
  • यवतमाळ विधानसभा भाजपचा बालेकिल्ला असून येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व आहे.
  • यवतमाळ विधानसभेवर विद्यमान आमदार मदन येरावार यांनी दावा केला आहे

  • काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती बाळासाहेब मांगूळकर
  • राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया
  •  प्रहारकडून तरुण चेहरा विपिन चौधरी यावेळी निवडणूक मैदानात उतरणार आहे

यवतमाळ: लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. यवतमाळ विधानसभेवर सर्वच पक्षांच्या दिग्गजांचा डोळा असला तरी यावेळी कुरूक्षेत्राच्या मैदानात दिग्गजांसोबतच तरुणांनीही उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आघाडी, युतीसह वंचित बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे)च्या तरुण पदाधिकार्‍यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
 
विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवार आपल्यापरीने मतदारसंघात मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. यवतमाळ विधानसभा भाजपचा बालेकिल्ला असून येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व आहे. मात्र, गेल्यावर्षी भाजप व सेना वेगवेगळे लढल्याने भाजपचे आमदार मदन येरावार यांना शिवसेनेने मोठे आव्हान दिले होते. 

यावेळी भाजप व शिवसेना युतीत लढणार आहे. पुन्हा एकदा यवतमाळ विधानसभेवर विद्यमान आमदार मदन येरावार यांनी दावा केला आहे. यवतमाळ विधानसभेत दिग्गजांना उतरविण्याची रणनीती सर्वच राजकीय पक्षांची आहे. मात्र, त्यांच्यासमोर उमेदवारी मागून तरुण पदाधिकार्‍यांनीही आव्हान उभे केले आहे. भाजप आमदार येरावार यांनाच पुन्हा संधी देणार असल्याची चर्चा आहे. 

काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती बाळासाहेब मांगूळकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे सुद्धा इच्छुक आहेत. या दिग्गजांना तरुणांचे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत प्रहार पक्षाने आपला उमेदवार दिला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीकरिता प्रहारकडून तरुण चेहरा विपिन चौधरी यावेळी निवडणूक मैदानात उतरणार आहे. मनसेसुद्धा उमेदवार देणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे यवतमाळ विधानसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News