तरुणांना "या" वेळी हार्ट अटॅकचा धोका अधिक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 September 2019

काही आजार असे असतात की, ते ठराविक वयानंतर होण्याची जास्त शक्यता असते. आरोग्यावर बदलत्या जीवनात अनेक रोगांनी प्रभाव टाकला आहे. या काळात तर तरुणांमध्ये देखील अशा आजारांचं प्रमाण खूपच वाढलं आहे. हार्ट अटॅकचा धोका तरुणांना कुठल्याही वयात होण्याची शक्यता जास्त आहे. तरुणांमधील हार्टअटॅकचे प्रमाण जास्त होत असल्याने, एका रिसर्च मध्ये हार्ट अटॅक पासून वाचवण्याचे काही उपाय सांगितले आहेत. 

हा रिसर्च करण्यासाठी तब्ब्ल सात वर्षाचा कालावधी लागल्याचे समजले. जवळ्जवळ १५ हजार ६०० इतक्या हॉस्पिटलच्या डेटाची तपासणी करून या रिसर्च मध्ये अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. त्यात असे समजले की, इतर आठवड्याच्या तुलनेत सोमवारी हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त आहे. आधीच्या हार्टअटॅक च्या तणावाने दुसऱ्या हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

तसेच जे तरुण नोकरी करतात त्यांना सोमवारी हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. का? तर सोमवारी कामाच्या ताणतणाव जास्त असतो. या रिसर्च मध्ये असाही दावा करण्यात आली की, डिसेंबर मध्ये हार्ट अटॅक चा धोका मोठ्या प्रमाणात असतो. तसेच सर्वात कमी धोका हा जुलै मध्ये असल्याचे समजले. 

तरुणांमध्ये  होणाऱ्या हार्ट अटॅकच कारण ही, त्यांनी या रिसर्च द्वारे स्पष्ट केले. कोणत्याही व्यक्तीला ताणतणाव असेल तर त्याला तितकाच धोका हार्ट अटॅकचा असतो. ताणतणावात शरीरातील होणाऱ्या बदला मुळेच हार्ट अटॅक चे प्रमाण वाढते. 

या पासून बचावाचा उपाय देखील या रिसर्च द्वारे स्पष्ट झाला. 

  • रोज एक्सरसाइज करणे
  • तणाव दूर करण्यासाठी पर्याय शोधणे
  • आहारातून पोषक तत्वांचं सेवन करणे
  • अल्कोहोल, सिगारेट  सेवन करून नये

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News