चाकूने हल्ला केल्यामुळे तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019

इचलकरंजी येथे एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. यड्राव नाक्याजवळ असणाऱ्या रेणुका मंदिरा जवळ तरुणावर हल्ला    झाला असून, त्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाला आहे.  या भागात घडलेली गेल्या ९ दिवसांमधील ही दुसरी घटना आहे.

इचलकरंजी : इचलकरंजी येथे एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. यड्राव नाक्याजवळ असणाऱ्या रेणुका मंदिरा जवळ तरुणावर हल्ला झाला असून, त्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाला आहे.  या भागात घडलेली गेल्या ९ दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. मृत तरुण हा मेंडिंग (यंत्रमागावरील उत्पादित कापड तपासणी करणारा) कामगार होता.

हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाचे नाव  राहुल शिवूडकर असून पूर्वीच्या वादातून काल (गुरूवारी) रात्री दहा वाजता त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

त्याच्या पोटात आणि मानेवर चाकूचे गंभीर वार करण्यात आले होते.  इचलकरंजी येथील इंदिरा गांधी उप-जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.  परंतु त्याला कोल्हापूरात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.  या प्रकरणी एका संशयिताला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News