'पब्जी' खेळण्यापासून रोखल्यामुळे तरुणाने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

'पब्जी'च्या वेडापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशीच एक घटना डहाणूमधील एका आदिवासी तरुणाला 'पब्जी' खेळण्यापासून रोखले म्हणून त्याने आत्महत्या केली .

पालघर - 'पब्जी' च्या  वेडापायी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अशीच एक घटना डहाणूमधील एका आदिवासी तरुणाला  'पब्जी' खेळण्यापासून रोखले म्हणून त्याने आत्महत्या केली . हेमंत झाटे असे या तरुणाचे नाव आहे.

हेमंतला  'पब्जी' गेमचं व्यसन जडलं होतं. रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर  'पब्जी' खेळत असे. मेहता यांनी हेमंतला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर.  'पब्जी' खेळू नको असं सांगितलं. हेमंत हा डहाणूमध्ये राहत असून सध्या तो कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तरुणाच्या घरची परिस्थिती हलाखाची असल्यामुळे त्याच शिक्षण थांबलं होतं. हेमंतच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मेहता ह्यांनी घेतली होती.

हेमंत हा रात्री उशिरापर्यंत तो मोबाइलवर  'पब्जी' खेळत असे, त्याला 'पब्जी' गेमचं व्यसन जडलं होतं.   मेहता यांनी हेमंतला अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. 'पब्जी' खेळू नको असं सांगितलं. सोमवारी तब्येत बरी नाही असं सांगून हेमंत त्याच्या खोलीमध्ये लवकर झोपण्यासाठी गेला. मात्र, त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही.


 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News