पवारांना पाहाचंय तरुण नेतृत्व

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 April 2019
  • महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत हे नवे चेहरे
  • जनतेचे प्रश्‍न सोडविताना युवा पिढीतील नेतृत्वांनी पुढे यावं

तळेगाव दाभाडे - ‘‘देशात सध्याचे राजकारण बदलत असून, १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तरुणांना संधी दिली होती. तोच विचार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, संग्राम जगताप, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे हे नवे चेहरे आणले आहेत.

आगामी काळात राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविताना या पिढीतील नेतृत्वांना आता पाहायचे आहे,’’ असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी शेतीचा विकास, उद्योगात वाढ, बेरोजगारांना काम, जातीधर्मात ऐक्‍य निर्माण करण्याच्या केवळ गप्पा मारल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

माझ्या राजकीय जीवनात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पाहिल्या. मात्र नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील सभा मात्र निराळीच वाटली. सभेला आलेल्या नागरिकांना सभेतून जाता येऊ नये म्हणून सभेच्या ठिकाणी खंदक खोदण्यात आले होते.
- शरद पवार,  
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News