मुंबईमध्ये तरुणाची अपहरण करून हत्या

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019

भायखळा येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. गणेश पोळ (२९) असे मृत तरुणाचे नाव असून पूर्ववैमनस्यातून तसेच सूडभावनेतून ही हत्या करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.

मुंबई : भायखळा येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. गणेश पोळ (२९) असे मृत तरुणाचे नाव असून पूर्ववैमनस्यातून तसेच सूडभावनेतून ही हत्या करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी भायखळ्यामधूनच संशयीत चौघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वडाळा येथील बीपीटी मार्गावरील गोदरेज जंक्शन येथे एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती मंगळवारी सकाळी वडाळा पोलिसांना मिळाली होती. या माहितीचा आधार घेत पोलिसांनी घटनास्तळ गाठले आणि त्यानंतर लगेचच तरुणाला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी  नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत असे घोषित केले. पुढे त्याच्या पाकिटामध्ये सापडलेल्या आधार कार्डवरून या तरुणाचे नाव गणेश पोळ असल्याचे स्प्ष्ट झाले.

पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी जारी केला असता भायखळा पोलिस ठाण्यात गणेश पोळ या नावाच्या व्यक्तीचे अपहरण झाले असल्याचा  गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर दोन गटांतील वादातून ही हत्या झाल्याचे समजले.

सुशांत साळुंखे या व्यक्तीसोबत गणेश पोळचे काही कारणास्तव भांडण झाले होते. त्याने अलोक, रुपेश आणि किसन या मित्रांच्या मदतीने सुशांतने गणेशला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह वडाळा येथे फेकून देण्यात आला असा निकष लावण्यात आला आहे. या हत्येमागील नेमक्या कारणाबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News