गावाच्या वेशीबाहेरील "कुरमाघरात" युवतीचा अंधश्रद्धेमुळे बळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

भामरागड (जि. गडचिरोली): मासिक पाळीच्या कालावधीत महिलांना राहण्यासाठी गावाबाहेर बांधलेल्या कुरमाघरात एका युवतीचा सर्पदंशाने मंगळवारी (ता.२३) सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. 

बेबी लालसू कोरसामी (वय १८) रा. गुंडुरवाही, असे मृत युवतीचे नाव आहे. आदिवासी समाजात मासिकपाळीच्या कालावधीत महिलांना गावाबाहेर बांधलेल्या झोपडीवजा घरात राहावे लागते. येथे फारशा सुविधा उपलब्ध नसतात. बेबी कोरसामी या कुरमाघरात असताना सोमवारी (ता. २२) रात्री तिला सापाने दंश केला. 

तिला सकाळी ८ वाजता भामरागड येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर आसल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. मंगेश कांबळे यांनी दिली. यापूर्वी शांता किरंगे या महिलेचाही कुरमाघरात मृत्यू झाला होत. दोन अपत्यांनंतर पुन्हा गर्भवती झालेल्या शांता किरंगेने तिसरे बाळ नको म्हणून गावठी औषधांनी गर्भपात करून घेतला. गावठी औषध घेतल्यावर तिला रक्तस्त्राव झाला. हा रक्तस्त्राव म्हणजे मासिक पाळी आहे असं समजून ती कुरमाघरात गेली. तिथेच अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News