पाळीव कुत्र्याने पाण्यात जाणाऱ्या लहान मुलीचे वाचवले प्राण ; व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

बोलता न येणारा पण आपल्या भावना समजून घेणारा हा कुत्रा आपल्या लहानग्या मैत्रिणीला वाचविताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी असल्याचे म्हटले जाते. त्याचा प्रमाणिकपणा दाखवणारा एक व्हिडिओ  सध्या व्हायरल होताना दिसत आहे. पाण्यात जाणाऱ्या एका लहानग्या मुलीला खेचून बाहेर काढत प्राण वाचवले आहे. सध्या हा कुत्रा आणि लहानग्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर या पाळीव कुत्र्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

बोलता न येणारा पण आपल्या भावना समजून घेणारा हा कुत्रा आपल्या लहानग्या मैत्रिणीला वाचविताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. <

>

१६ सेंकदाच्या व्हिडीओमध्ये मुलगी नदीमध्ये पडलेला चेंडू घेण्यासाठी जाताना दिसत आहे. पाण्यात गेलेला चेंडू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुलीचा फ्रॉक पकडून तिला नदीच्या किनाऱ्यापासून दूर केल्याचं दिसत आहे. त्यानंतर हा कुत्रा नदीमध्ये जाऊन तोंडात चेंडू घेऊन येतो.

हा व्हिडीओ Physics-astronomy.org या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला असून व्हिडीओला आतापर्यंत ९८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे तर ३.५ बिलियन पेक्षा आधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News