'लक्ष्मी-नारायणाच्या' लग्नासाठी चेन्नईहून मागवलेल्या दागिन्यांची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

टिव्हीवरील मालिकांमधील कलाकारांच्या वेषभूषेबाबत सगळीकडेच चर्चा असते. कलाकारांच्या कपड्यांपासून ते त्यांनी परिधान केलेले दागदागिने तसेचं त्यांच्या मेकअप देखील प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतो. आता अशाच एका मालिकेने प्रेक्षकांच लक्ष वेधलय ते कलाकारांनी परिधान केलेल्या दागिन्यांनी.

मुंबई : टिव्हीवरील मालिकांमधील कलाकारांच्या वेषभूषेबाबत सगळीकडेच चर्चा असते. कलाकारांच्या कपड्यांपासून ते त्यांनी परिधान केलेले दागदागिने तसेचं त्यांचा मेकअप देखील प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतो. आता अशाच एका मालिकेने प्रेक्षकांच लक्ष वेधलय ते कलाकारांनी परिधान केलेल्या दागिन्यांनी. ‘श्री लक्ष्मीनारायण’ या मालिकेत अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी वेगवेगळे आकर्षक दागिने खास चेन्नईहून मागवण्यात आले आहेत. दागिन्यांसाठी तब्बल आठ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

‘श्री लक्ष्मीनारायण’ या मालिकेत लवकरच लक्ष्मी-नारायण यांचा विवाह सोहळा रंगणार आहे. स्त्री प्रेक्षकांना मालिकांमध्ये दिसणाऱ्या दागिन्यांविषयी विशेष आकर्षण असतं. त्यामुळे या विवाह सोहळ्याची स्त्री प्रेक्षकांना अधिक आतुरता लागलीय. सोहळ्यासाठी लक्ष्मीचं मंगळसूत्र खास तयार करून घेण्यात आलं आहे. विष्णूला आकर्षित करणाऱ्या शंखांचा वापर या मंगळसूत्रामध्ये करण्यात आला असून, त्याला सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. लग्नसोहळ्यासाठी फुलांचा आणि दागिन्यांचा आंतरपाट तयार करून घेण्यात आलाय. लग्नासाठी आवश्यक असलेल्या मुंडावळ्या सोनेरी असतील. त्याचबरोबर चेन्नई सिल्कचाही वापर करण्यात आला आहे. विष्णूसाठी वेगळे दागिने, तर विवाहानंतर लक्ष्मी फुलांचे दागिने परिधान करेल. पायातल्या जोडव्यांपासून, नथ आणि केसांमध्ये घालण्यासाठी आकर्षक दागिने मागवण्यात आले आहेत.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News