चार क्षणांचे आयुष्य

सुप्रिया
Thursday, 27 June 2019

तुझ्याकडे उरले काही
माझाकडे काही उरले
चार क्षणांचे दीर्घ आयुष्य
म्हणता म्हणता सारे सरले...

तुझ्या भेटीचे पाऊसवारे
अजून येती गोड शहारे
थेंबांमधल्या ओलाव्याचे
कणभर ओझे मागे उरले...

कितीक हसले शुभ्र मोगरे
आणिक पक्षी त्यावर हसरे
तुझ्या हातातील दोन कळ्यांचे
पान टपोरे मनी कोरले...

तुझ्याकडे जे उरले काही
माझ्यापाशी नाही उरले
नूरले आता शब्द पुरेसे
बोल कोवळे नाही उरले..!

तुझ्याकडे उरले काही
माझाकडे काही उरले
चार क्षणांचे दीर्घ आयुष्य
म्हणता म्हणता सारे सरले...

तुझ्या भेटीचे पाऊसवारे
अजून येती गोड शहारे
थेंबांमधल्या ओलाव्याचे
कणभर ओझे मागे उरले...

कितीक हसले शुभ्र मोगरे
आणिक पक्षी त्यावर हसरे
तुझ्या हातातील दोन कळ्यांचे
पान टपोरे मनी कोरले...

तुझ्याकडे जे उरले काही
माझ्यापाशी नाही उरले
नूरले आता शब्द पुरेसे
बोल कोवळे नाही उरले..!

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News