मुंबईकरांचा दोषी तुच..!

प्रतिक कांबळे,पवई
Saturday, 29 June 2019

पावसा तु उकाड्याने त्रस्त जनतेला
मुसळधार कोसळून थंडगार वारा देतोस रे

सांग पावसा तु मुंबई तुंबवतो
का ती आपोआप तुंबते रे
माझ्या लेखणीतून निघालेले दोन शब्द
का या सरकार ला झोंबते रे

पावसा तु उकाड्याने त्रस्त जनतेला
मुसळधार कोसळून थंडगार वारा देतोस रे
तुच दोषी आहेस मुंबईकरांचा कारण
तु येतोस अन् मुंबईची तुंबापुरी करून ठेवतोस रे

आमच सरकार झाडांना फलक लावून
आपले हात वर करून घेतो रे
पावसा तुच फाडतोस फलक ओले करून
अन् तुच निष्पाप मुंबईकरांचे प्राण घेतो रे

नालेसफाई तर केली होती महापालिकेने
पण तु पुन्हा नाल्यात जाऊन वाहतो रे
मात्र पावसा तु आल्यावर मुंबईकर
त्या नाल्याच्या पाण्यात संसार थाटतो रे

या गरीब मुंबईकरांचा पावसा
तुच दोषी अन् तुच अपराधी आहेस रे
मुसळधार येऊन गुन्हा करणारा
तुच मुंबईकरांचा गुन्हेगार आहेस रे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News