सतत येत असेल थकवा तर 'या' गंभीर आजाराचा धोका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019
  • सतत थकवा येणे ही फक्त शारीरिक कमजोरी नसून शरीरात वाढत असलेल्या लंग कॅन्सरचे लक्षण असू शकते.
  • अनेक वेळेस श्वास घेण्यास अडचण येणे, भूक न लागणे, सतत घाबरल्यासारखं वाटणे, रूग्णाच्या चेहऱ्यावर सूज येणे, अशी लक्षणे दिसून येतात.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आजारांकङे सर्रास दुर्लक्ष करत असतो. पण आपल्याला हे मीहीत नसत की पुढे जाऊन त्याचे किती भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आपण स्व:ताहुन अनेक आजारांना आमंञण देत असतो वेळेवर उपचार न करुन.

आपल्याला सतत थकवा येत असल्याचं कारण शरीरात पोषणाची कमतरता असे आपण म्हणतो. प्रत्येक वेळी हेच कारण नसते. थोडावेळ चालल्यानंतर धाप लागणे, सतत थकवा येणे ही फक्त शारीरिक कमजोरी नसून शरीरात वाढत असलेल्या लंग कॅन्सरचे लक्षण असू शकते.

फुप्फुसामध्ये कॅन्सर वाढत असताना त्या व्यक्तीला खुप अडचणींना सामोरे जावे लागते. जसे की खोकलतांना कफ येणे आणि कफात रक्त येणे, छातीत वेदना होणे, सतत खोकला येणे, अशी लक्षणे असतात. प्रत्येक रूग्णांमध्ये हीच लक्षणे दिसून येतील असे नाही. अनेक वेळेस श्वास घेण्यास अडचण येणे, भूक न लागणे, सतत घाबरल्यासारखं वाटणे, रूग्णाच्या चेहऱ्यावर सूज येणे, अशी लक्षणे दिसून येतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News