योगी आदित्यनाथ म्हणतात, 'डॉक्‍टर आणि रुग्णांमध्ये असावा भावनिक संवाद'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

‘‘डॉक्‍टर आणि रुग्णांमधील संवाद सध्याच्या काळात हरवलेला आहे. या दोघांमधील भावनिक संवाद वाढल्यास संबंध सुधारण्यास आणि उपचारांमध्येही मोठी मदत होऊ शकते,’’

- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री-उत्तर प्रदेश

लखनौ : ‘‘डॉक्‍टर आणि रुग्णांमधील संवाद सध्याच्या काळात हरवलेला आहे. या दोघांमधील भावनिक संवाद वाढल्यास संबंध सुधारण्यास आणि उपचारांमध्येही मोठी मदत होऊ शकते,’’ असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज व्यक्त केले. सध्या रुग्णसेवेचे व्यावसायीकरण झाले असून, यामुळे सेवेची भावना हरपली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आदित्यनाथ यांनी आज ‘स्माइल मशाल ज्योती’ या उपक्रमाचे उद्‌घाटन केले. या उपक्रमाद्वारे वैद्यकीय सेवेतील संवाद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. 

बिहारमध्ये येणार भाजपचेच राज्य
रांची : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळवून देण्याचा निश्‍चय केला असून, त्यासाठी ‘अब की बार ६५ पार’ अशी घोषणा दिली आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने ४२ जागा मिळवीत सत्ता स्थापन केली होती.

एकेकाळी राजकीयदृष्ट्यात अस्थिर असलेल्या झारखंडमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे रघुबर दास पहिले मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर एका मुलाखतीमध्ये त्यांनी काही महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आणखी मोठे यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News