अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय आणि आदर्श

जालींदर धांडे
Friday, 25 January 2019

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणारे योगेश्वरी महाविद्यालय

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणारे योगेश्वरी महाविद्यालय

 जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील  विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हाच उद्देश योगेश्वरी महाविद्यालयाचा आहे. अशी माहिती प्रभारी प्राचार्या डॉ . भारती देशमुख यांनी दिली. त्या म्हणाल्या, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी आमचे महाविद्यालय संलग्न आहे. महाविद्यालयात अध्ययन-अध्यापनाबरोबरच राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण, राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम, विविध व्याख्यानमाला, शून्य कचरा प्रकल्प, ऑनलाईन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा असे उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
 
करण्यात येते. आत्महत्येपासून शेतकऱ्यांनी दूर व्हावे, म्हणून दहा गावात जाऊन प्रबोधन करण्यात आले. सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येतो. राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्फत स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते. आय.आय.टी. खरकपूर यांच्या वतीने प्रशिक्षण वेळापत्रक आखण्यात येते. त्याची नोंदणीही करण्यात येते. त्यांच्या मार्फत विद्यार्थ्याना नॅनो पार्टिकल्स बायोटेक्नॉलॉजी संदर्भात प्रशिक्षण देण्यात येते. चाचणी घेऊन पाच विद्यार्थ्यांची निवड पुढील प्रशिक्षणासाठी करण्यात येते. 

विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्रामिण भागात शिबीर घेऊन सामाजिक काम करण्यात येते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण, रक्तदान शिबीर व स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात येतात. राज्यस्तरीय कै. बाबासाहेब परांजपे वादविवाद स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मागील वर्षात योगा व मेडिटेशनचे तीस दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
महाविद्यालयात विज्ञान अभ्यासक्रमासोबत इलेक्ट्रॉनिक्स, दुग्धशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रिकल्स मेंटनन्स ही व्यावसायीक अभ्यासक्रमे आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दीड महिन्याचा "फाउंडेशन कोर्स" सुरू करण्यात आला आहे. विज्ञान शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यासाठी स्पेशल बॅचचे आयोजन केले असून त्यांची दर गुरुवारी परीक्षा घेण्यात येते. विध्यार्थ्यांना समुपदेशनही करण्यात येते. मायक्रोबॉयलॉजी विषयाची राज्यस्तरीय संघटना असून त्याचे सदस्यत्व महाविद्यालयाने स्वीकारले आहे. विविध उपक्रमात महाविद्यालय अग्रेसर आहे. काही दिवसांपूर्वी महाविद्याल्यात भौतिकशास्त्र विषयायाची एम.सी.क्यू कार्यशाळा घेण्यात आली. 

दरवर्षी उन्हाळ्यात मुलींच्या स्वसंरक्षणाकरिता माहिला आत्मभान शिबीर संस्थेच्या वतीने घेण्यात येते. त्यात महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांचा मोठा सहभाग असतो. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कारही करण्यात येतो.
 
महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ . व्यंकट हामदे हे बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन आहेत. रसायनशास्त्र  विभागातील डॉ .व्ही.आर. चौधरी, जीवशास्त्र विभागातील डॉ .आर. वाय. कुलकर्णी हे बोर्ड ऑफ स्टडीचे सदस्य आहेत. महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा वाढती आहे. महाविद्यालयाचे भव्य ग्रंथालय असून त्यात विविध तसेच शैक्षणिक विषयासाठी भरपूर पुस्तके आहेत. दरवर्षी ग्रंथप्रदर्शन आयोजित केले. उत्कृष्ट वाचकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गरीब विद्यार्थ्यांसाठी आल्प दरात वस्तिगृह आणि भोजनाची सोय केली आहे. एकंदरित भव्य-दिव्य ईमारतीत भव्य-दिव्य स्वप्न घेऊन जगणारे विध्यार्थी शिकायला येतात, हे या विद्यालयाचे वैशिष्ठ आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News