कॉलेज ऑफ़ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात योगा कार्यशाळा संपन्न 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • एन.एस.एस. विभागाने विद्यार्थ्यांसाठी 24 ते 26 जून तिन दिवस योगा सत्राचे आयोजन
  • एक दिवस योगा केल्याने आपले आरोग्य सुधारणार नाही

मुंबई: चेंबूर येथील विवेकानंद एजुकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ़ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाने विद्यार्थ्यांसाठी 24 ते 26 जून तिन दिवस योगा सत्राचे आयोजन केले होते. एक दिवस योगा केल्याने आपले आरोग्य सुधारणार नाही त्यामुळे हा कार्यक्रम तीन दिवस ठेवण्यात आला होता.

पहिला दिवस 
सकाळी 11:30 वाजता कार्यक्रमाची सुरूवात झाली. एन.एस.एसचे 12 विद्यार्थी व कार्यक्रमाच्या प्रभारी डॉ. वैष्णवी बागुल यांनी कार्यक्रमाची सर्व सुत्र संभाळली. स्टेट व नेशनल स्तरावरील व अरिएअल योगा विजेता महेश्वर व तन्मय मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दिवशी 35 विद्यार्थ्यांनी उपस्थिती होते

दुसरा दिवस
सकाळी 8:30 वाजता कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांना अनेक आसने शिकवण्यात आले. जसे की, अनुलोम- विलोम, वज्रासन इ. कॉलेजच्या अॅडमिन स्टाफ मिस. साक्षी मनशर्मानी यांनी आपली उपस्थिती दाखवून मुलांना प्रोत्साहित केले. 

तिसरा दिवस
सकाळी 8:30 वाजता कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांच्या शरीराला आसनांची सवय झाली होती. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रोत्साही करण्यासाठी एन.एस.एसचे कार्यक्रम अधिकारी विकास वारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तिनही दिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साह दाखवला. सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले व त्यांनी जे काही शिकल ते आपल्या आयुष्यात आजमवण्याचा संकल्प घेतला. 

मुलांच्या अयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी एन.एस.एस विभागाने केलेला हा छोटासा प्रयत्न होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News