हातांची मजबुती वाढविण्यासाठी हे करा..!

मनाली देव, योग प्रशिक्षक
Thursday, 31 January 2019

आजपासून आपण काही व्यायामप्रकार म्हणजेच पूरक हालचाली (वॉर्मअप) पाहणार आहोत. या हालचाली केल्यानंतर आसनांचा अभ्यास करणे सोपे जाते. आज आपण हाताचे काही व्यायामप्रकार पाहू. हे प्रकार आपण दिवसभरात कधीही करू शकतो. कार्यालयात संगणकाचा सातत्याने वापर केल्याने हात दुखू लागतात. ते कमी करण्यासाठी किंवा हाताची मजबुती वाढविण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी पुढील व्यायामप्रकार आवश्‍यक आहेत.

हाताचा पहिला व्यायामप्रकार म्हणजे, ते कोपरात न वाकवता सावकाश गोलाकार फिरवावेत. दररोज निदान पाच वेळा तरी हा व्यायामप्रकार करावा. हात उलटसुलट अशा दोन्ही दिशांनी फिरविणे आवश्‍यक आहे.

डावा व उजवा हात गोलाकार फिरवून झाला की मनगटाचे गोलाकार चक्र करावे. त्यामुळे, मनगटावर आलेला ताणही कमी होईल. मनगट वरखाली हलवावे. आता चौथ्या प्रकारांमध्ये बोटांच्या हालचाली आवश्‍यक आहेत. यासाठी हाताचा तळवा ताठ ठेवून बोटांची उघडझाप करावी.

यामुळे, बोटांच्या सांध्यामधील ताण कमी होऊन हाताची पकड सुधारते. हाताचे व्यायाम झाल्यानंतर मानेकडेही लक्ष द्यावे. मानेची सावकाश हालचाल करावी. ती एकदा डावीकडे व उजवीकडे वळवावी. हनुवटी खांद्याच्या वर येईल, एवढी मान वर वळविण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर, मान डावीकडे व उजवीकडे वाकवावी. कान खांद्याच्या दिशेला येईल, हे पाहावे. यामुळे मानेवरचा ताण कमी होतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News