‘योगा’प्रेमी दीपिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

प्रेग्नन्सीनंतर पुन्हा एकदा अभिनेत्री दीपिका सिंग छोट्या पडद्याकडे वळली आहे. दीपिका तिच्या नेहमीच्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ योगासाठी राखीव ठेवते.

प्रेग्नन्सीनंतर पुन्हा एकदा अभिनेत्री दीपिका सिंग छोट्या पडद्याकडे वळली आहे. हिंदी ‘कलर्स वाहिनी’वरील ‘कवच महाशिवरात्री’ या मालिकेच्या निमित्ताने तिने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे.

दीपिका चित्रीकरणाच्या वेळा सांभाळत कुटुंबाकडेही सध्या अधिक लक्ष देत आहे. पण या सगळ्या व्यापात दीपिका तिचं फिटनेस सांभाळत आहे.

दीपिका तिच्या नेहमीच्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ योगासाठी राखीव ठेवते. इतकच नव्हे; तर चित्रीकरणादरम्यानही फावल्या वेळेत ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये योगा करते.

याचबाबत दीपिका सांगते, ‘मी योगाला फार महत्त्व देते. चित्रीकरणादरम्यान थोडा वेळ मिळाला तरी मी योगा करते. योगासाठी मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खास जागा तयार करून घेतली आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News