असे करा योगनिद्रासन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

योगनिद्रासन हे पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे. म्हणजेच हे शयनस्थितीतील आसन आहे.

योगनिद्रासन हे पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे. म्हणजेच हे शयनस्थितीतील आसन आहे. प्रथम पाठीवर झोपावे. त्यानंतर, दोन्ही गुडघे वाकवून हाताच्या आधाराने एकेक पाय डोक्‍याच्या मागील बाजूला म्हणजेच मानेपर्यंत घ्यावा.

आपण एकपादविरासनामध्ये पायाची स्थिती घेतो, त्याप्रमाणे स्थिती घ्यावी. दोन्ही पाय व्यवस्थित मानेपर्यंत गेल्यावर ते एकमेकांमध्ये अडकल्याप्रमाणे दिसतात. डावा पाय डाव्या खांद्याच्या मागून व उजवा पाय उजव्या खांद्याच्या मागून घेतल्यानंतर दोन्ही खांदे वर उचलले जातात. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे हात मांडीवरून पाठीकडे घेऊन हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफावी. आसनस्थितीमध्ये श्‍वसन संथपणे सुरू ठेवावे.

आसनांत शक्‍य असेल तितकावेळ स्थिर राहावे. जबरदस्ती करू नये. त्याचप्रमाणे, खूप ओढूनताणून झटका देऊन आसनस्थिती करू नये. अन्यथा दुखापत होऊ शकते. आसन सोडताना सावकाश उलटक्रमाने सोडावे. योग्य मार्गदर्शन व नियमित सरावाने आसन सहज जमू शकते. या आसनाच्या सरावाने शरीराची लवचिकता वाढते. फुफ्फुसांचे कार्य सुधारते. पोटातील अवयवांवर दाब आल्याने त्यांचेही कार्य सुधारून सुदृढता येते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News