योगदिन: सीएसएमएसएसमध्ये योगासने, योगदिंडी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत (सीएसएमएसएस) उत्साहात साजरा झाला
  • क्रांती चौक ते विभागीय क्रीडा संकुल योग दिंडी काढण्यात आली

औरंगाबाद: आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवारी (ता. 21) छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत (सीएसएमएसएस) उत्साहात साजरा झाला. सकाळी सहा ते साडेसात दरम्यान कार्यक्रम झाला. आदल्या दिवशी क्रांती चौक ते विभागीय क्रीडा संकुल योग दिंडी काढण्यात आली. 

योग क्रियांचे संचालन डॉ. वनिता पुरी यांनी केले. आयुर्वेद महाविद्यालयाच्या योगशिक्षिका रुपा क्षीरसागर यांनी योगासने, प्राणायाम याचे प्रात्यक्षिके दाखवली. डॉ. जयश्री देशमुख यांनी योगशास्त्राचे महत्व सांगितले. तर डॉ. लता राठोड यांनी उपस्थितांना योग संकल्प दिला. उत्कृष्ट योगासने व प्राणायाम करणाऱ्या अध्यापक, विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. योगदिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंधस्पर्धेतील गुणवंतांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुभाष भोयर, कृषी महाविद्यालयाचे संचालक व प्राचार्य डॉ. दत्तात्रय शेळके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य गणेश डोंगरे, अशोक आहेर, डॉ. जयश्री देशमुख यांची उपस्थिती होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News