"यिन"तर्फे वृक्ष जनजागृती अभियान; विविध भागांत सिडबॉलचे वितरण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

अमरावती   : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होत असतानाच सकाळच्या "यंग इन्स्पिरेटर  नेटवर्क"च्या (यिन ) चमूने सुद्धा त्यात पुढाकार घेतला आहे . सिडबॉल तयार करून तरुणांनी जंगल तसेच विभाग भागांत झाडे लावण्यासाठी जनजागृती सुरु केली आहे. 

निसर्गाने आपल्याला जे दिले त्याचा परतावा करणे ही आपली महत्वाची जबाबदारी असते. तसेच निसर्गाचे बिघडत चालेले संतुलन, वृक्षांची होणारी कत्तल या सर्वांवर उपाय म्हणून वृक्षारोपण गरजेचे आहे .

ही गरज ओळखून यंग  इन्स्पिरेटर  नेटवर्क  (यिन) जिल्हा उपाध्यक्ष आदित्य मोहोडयांनी २५०० सिडबॉल तयार करून  ते विविध शासकीय विभागांत तसेच महापालिकेला दिले. हा सिडबॉल वितरित करून त्यांना पर्यावरण विषयक माहिती व जनजागृती करण्यात येत आहे. सदर सिडबॉल पाऊस पडताच जंगलात फेकून देण्यात आल्यास त्यापासून  फेकून देण्यात आल्यास त्यापासून झाडे आपोआप तयार होतात. अशाप्रकारे पर्यावरण रक्षण होण्यास मोठ्या  प्रमाणात मदत होते, असा संदेश यिनच्या चमूकडून देण्यात आला.

कडुनिंब ,वाद, पिंपळ, जांभूळ, सीताफळ अशा झाडांच्या बिया गोळा करून त्यात माती, शेण एकत्र करून त्याचे लाडूच्या आकाराचे गोळे करण्यात आले. यासाठी आदर्श महाविद्यालयातील रासेयो अधिकारी डॉ. नरेंद नागपूरे, प्रा .श्रीकांत पाटील व महाविद्यालयातील यिन सदस्य गौरव मनावर, पायल गुप्ता, भावना चौरे, ऋषिकेश साबळे, लक्ष्मी सोधिया यांचे सहकार्य लाभले.

या अभिनयाची माहिती महापालिकेचे उपयुक्त नरेंद्र वानखेडे यांना  देण्यात आली. या वेळी अमरावती शहरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे व याला कारणीभुत आपण आहोत. वृक्षलागवड होत नाही, यावर तोडगा काढण्यासाठी सकाळ "यिन"तर्फे जो उपक्रम चालू केला आहे  तो कौतुकास्पद  आहे, असे मत नरेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News