मुंबईकरांच्या शौचालयच्या वेळा परप्रांतीय ठरवणार का?

चंद्रकांत विसपुते
Tuesday, 16 July 2019

आधी परप्रांतीयांना एवढी मुजोरी येते कुठून अश्या शीर्षकाने लिहिणार होतो मात्र त्यापेक्षा मुंबई परप्रांतियांचीच हे दुर्दैवाने का असेना पण जास्ती संयुक्तिक शीर्षक वाटले.

आधी परप्रांतीयांना एवढी मुजोरी येते कुठून अश्या शीर्षकाने लिहिणार होतो मात्र त्यापेक्षा मुंबई परप्रांतियांचीच हे दुर्दैवाने का असेना पण जास्ती संयुक्तिक शीर्षक वाटले. रात्री सव्वा अकराच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ६ वर असणाऱ्या सार्वजनिक शौचालयात गेलो असताना त्याला कुलूप होते. बंद का आहे म्हणून विचारल्यावर ११ बजे लास्ट ट्रेन जाने के बाद बंद होता है. हे अत्यंत असंबंध उत्तर तिथल्या परप्रांतीय माणसाने दिले.  

शेवटची लोकल पाऊण वाजता जाते सांगितल्यावरही त्याचा ११ बजे के बाद बंद होता है हा घोषा सुरूच होता. तू वेळेच्या आधी हे बंद केले आहे मी स्टेशन मास्तरला तक्रार करतो, व्हिडीओ बनवून फेसबुकला टाकतो हे सांगूनही जो करना है करो, जिसको कम्प्लेंट करना है करो जाओ मै नही खोलुंगा.  जवळपास वय वर्ष ६० असणाऱ्या ह्या परप्रांतीय थेरड्याचा उर्मटपणा, मुजोरी डोक्यात जाऊन हा विडिओ बनवला.  

दरम्यान सहायक स्टेशन मास्तरला हा प्रकार सांगितल्यावर अच्छा ऐसा है क्या, इतने जल्दी तो बंद नही करना चाहिये लास्ट लोकल तो पौना बजे जाता है. आप एक काम किजिये वैटिंग रूम का टॉयलेट युज कर लिजिए, हम देखता हू। माझ्यासमोर फोन वैगरे लावायचा प्रकार (नाटक) केला. प्रतिक्षालयातील शौचालयाची अवस्था तर बघताच उलटी होणारी होती. आतले शौच खुप विष्ठेने वाहणारे होते. हा प्रकार तर अजून किळसवाणा कारण तिकीट काढून येणाऱ्या माणसाला साधी स्वच्छ शौचालये देखील मिळू नयेत? तिकिटाचे जे पैसे रेल्वे प्रशासन तुमच्या माझ्याकडून घेते त्यात ह्या सुविधांचा अंतर्भाव असतो.  ह्या विषयवार पुन्हा सविस्तर लिहीन.

प्रतिक्षालयाच्या शौचालयातून कसा बसा बाहेर आलो दरम्यान १५ मिनिटे झाली होती तरी देखील हे खमंग पद्मजा नावाच्या ठेकेदाराने चालवायला घेतलेले शौचालय बंदच. आतमध्ये असलेले दोन्ही नमुने बिनधास्त जेवत होते. त्याक्षणी हे रेल्वे प्रशासनाला देखील फाट्यावर मारतात याचा राग देखील होता आणि त्या घाणेरड्या वातावरणात ते अन्न सेवन करताय याचं वाईट देखील वाटत होतं. त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर एकाने साडे अकरा आणि दुसऱ्याने ११ वाजता आम्हाला बंद करायला सांगितले आहे हीच उत्तर होती.  त्याही परिस्थितीत त्यांना तुम्ही बंद कसे करू शकतात विचारल्यावर मग काय २४ तास उघडे ठेवू का? काय करायचे ते करा ही मुजोरी होतीच ... 

हा विषय ३ टप्प्यात विभागलेला आहे 
१ पहिला बाहेरून येऊन इथल्या माणसांच्या सुविधेवर टाच आणून उलट त्यांच्यावर उर्मटगिरी करण्याची मुजोरी ह्या परप्रांतियांमध्ये कुठून येते? अगदी प्रशासनालाही न जुमानणारी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी. चुकीचे काम करूनही शिरजोर होणारे हे कोणामुळे शिरजोर होताय तेही दादर सारख्या मराठी बहुल, मराठी प्रेमी, मराठी अभिनिवेशी भागात (ही विशेषण खोटी असावीत कदाचित). मला उत्तर माहिती आहेत पण ती हे वाचणाऱ्यांकडुन हवी आहेत. 

२ दुसरा विषय - रात्री अपरात्री कुणी महिला, गरोदर महिला, अपंग, वयोवृद्ध यांना अचानक लघवीला किंवा शौचाला आली तर त्यांनी काय करायचं? दुसरं शौचालय शोधत बसायचं? दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचे की स्वतःच्या आरोग्याशी खेळत येणाऱ्या वेगाला अवरोध करायचा? तरुण असणाऱ्यांना हे शक्य आहे पण गरोदर, वयोवृद्ध यांनी ते तरी कसे करावे? स्वच्छ भारत अभियान अजून यशस्वी न होण्यामागे अपुरी साधने आणि व्यवस्था हे देखील कारण आहे. (सोबत असलेला कचरा कुठे टाकायचा यासाठी पण कचरा कुंडी न मिळाल्यामुळे तो बॅगेत भरून घरी आणावा लागतो ) रेल्वे प्रशासन याबाबतीत ठेकेदारांवर अंकुश ठेवू शकत नसेल तर ही त्यांची नाचक्की आहे किंवा त्यांची ठेकेदारांसोबत मिलीभगत तरी आहे . 

३ तिसरा आणि तेवढाच महत्वाचा विषय - ज्या ठेकेदाराने हे प्रसाधन गृह चालवायला घेतले आहे तो तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याशी कसा काय खेळू शकतो. लाखो करोडोने जंतू विषाणू असणाऱ्या सार्वजनिक शौचालयात रात्रीच्या वेळी सर्व आवरून झाल्यावर त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्याच घाणीत कसा काय करू शकतो? म्हणजे त्यांना मनुष्य म्हणून वागवूच शकत नाही का? प्राण्यांना देखील आपण उष्ट किंवा बाशी मोकळी आणि स्वच्छ जागा बघून खायला टाकतो इथे तर शौचकूपाच्या बाजूलाच .

ह्या संपूर्ण घटनेच्या तिन्ही बाजू आपल्यासमोर मांडल्या आहेत. मुंबईकरांच्या सार्वजनिक जीवनात हागण्या मुतण्याच्या वेळा आता परप्रांतीय ठरवणार का? (सर्व सार्वजनिक शौचालयात कोण असतं हे तुम्ही सुद्धा अनुभवा ) ह्यांना चढणारा माज हा सत्ताधारी किंवा राजकीय वरद हस्तामुळे असला तरी सर्वसामान्य मराठी नागरिक म्हणून आपण जागृत नाही हे कारण देखील तेवढेच अधोरेखित करणारे आहे. (वर्षानुवर्षे मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांशी हिंदीत बोलणारे मराठी, मराठीचा कैवार घेतलेल्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते मी रोजच बघतो ). 

रेल्वे प्रशासनात उत्तर भारतीयांच्या भरणा अधिक असल्याने आपण दोघी भाऊ मिळून मिसळून खाऊ हि प्रवृत्ती भयानक प्रमाणात वाढीस लागली आहे. (तिकीट फाईन मारताना उत्तर भारतीयाला झुकते माप देऊन सोडणारे अनेक महाभाग नेहमी पाहायला मिळतात) कामगाराला माणूस म्हणून जागवताना ठेकेदार जनावरं होत आहेत. जो वर आपण सर्व मिळून यावर दबाव आणत नाहीत तो वर ना हे नियमांना डावलणारे परप्रांतीय सुधारणार ना रेल्वेतले कामचुकार अधिकारी आणि नाही अमानुष ठेकेदार . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News