'पिवळ्या साडी'वाल्या पोलिंग महिला अधिकारी आता 'गुलाबी' साडीत बूथवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

लोकसभा निवडणुकीच्यावेळी पिवळ्या साडीतील बूथ अधिकारी असलेल्या महिलेचा फोटो देशभरात वायरल झाला होता. त्या महिला अधिकाऱ्याचे नाव रिना द्विवेदी असून लखनऊमध्ये पोटनिवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर हजर होत्या.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी पिवळ्या साडीतील बूथ अधिकारी असलेल्या महिलेचा फोटो देशभरात वायरल झाला होता. त्या महिला अधिकाऱ्याचे नाव रिना द्विवेदी असून लखनऊमध्ये पोटनिवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर हजर होत्या. यावेळी त्यांनी गुलाबी साडी मध्ये मतदान केंद्रावर आल्या होत्या,  त्यांचे गुलाबी साडीतील फोटो नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहेत.

रविवारी सकाळी जेव्हा रिना पोलिंग बूथवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. रिना या लखनऊच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्या लखनौमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ऑन ड्युटी तैनात होत्या. त्यांची नियुक्ती कृष्णा नगर येथील एका कॉलेजमध्ये होती. उत्तर प्रदेशातील अकरा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News