माऊलींच्या सोहळ्यासाठी यंदा ‘मोती’ अश्‍व

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या आषाढी वारीतील पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी मारवाड जातीचा, तांबूस रंगाचा नवा अश्‍व दाखल होत आहे.

आळंदी - संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या आषाढी वारीतील पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी मारवाड जातीचा, तांबूस रंगाचा नवा अश्‍व दाखल होत आहे. आळंदी ते पंढरपूर प्रवासासाठी अंकलीमधून शुक्रवारी (ता. १४) शुद्ध द्वादशीला शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून माउलींचा १६ वर्षांचा मोती आणि स्वाराचा हिरा नावाचा, असे दोन्ही मानाचे अश्‍व आळंदीकडे प्रयाण करणार आहेत. 

याबाबत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी माहिती दिली, की माउलींचा पालखी सोहळा मागील वर्षी आळंदीतून पुण्याकडे मार्गस्थ झाल्यावर रात्री पुणे मुक्कामी माऊलींचा अश्‍व दगावला. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोती माउलींच्या पालखी सोहळ्यात सेवेसाठी नव्याने दाखल होत आहे. यंदा माऊलींच्या सोहळ्याचे १८७ वे वर्षे आहे. अंकली ते आळंदी हा सुमारे ३०० किलोमीटरचा ११ दिवसांचा प्रवास आहे. याशिवाय आळंदीतून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पंढरपूरपर्यंत सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास हा माउलींचा आणि स्वाराचा, असे दोन्ही अश्‍व करणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News