ठरलं..! यंदाचे ९३ वे साहित्य संमेलन उस्मानाबादमध्येच होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • यंदाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी २०२० मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

औरंगाबाद :  अखेर ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.  यंदाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी २०२० मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

संमेलनाच्या नेमक्या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात येणार आहे. गेल्या सात आठ वर्षांपासून मसापची उस्मानाबाद शाखा हे संमेलन मिळावे म्हणून प्रयत्नशील होती. 

महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नाशिक व उस्मानाबाद येथील दोन संस्थांनी निमंत्रणे पाहणीसाठी निवडली. व त्या ठिकाणी पाहणी केली. या समितीने तिचा अहवाल महामंडळाला दिला होता. यावेळी कार्यवाह दादा गोरे, उस्मानाबादचे संयोजक व मसापचे अध्यक्ष नितीन तावडे आदी सभासद उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद जिल्ह्याला मिळण्याचे संकेत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिले होते. त्यावेळी उस्मानाबाद शहरातील कार्यक्रम स्थळाची देखील पाहणी करण्यात आली होती. तसेच शहरासह जिल्ह्यातील अनेक क्षेत्रातील मंडळी संमेलनासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर आज पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत घोषणा केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News