सामाजिक बांधिलकी जपणारं हलकर्णीचं यशवंतराव चव्हाण महाविद्यालय

प्रा. राजेश घोरपडे
Friday, 6 September 2019

सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय, हलकर्णी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य

हलकर्णी, ता. चंदगड - येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील येथील राष्ट्रीय सेवा योजने मार्फत येत्या काही दिवसात समाजाभिमुख कार्य हाती घेतले. सिनिअर विभागाचे दोन युनिट व ज्युनिअर विभागाचे एक युनिट यामधील एकूण २५० विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील इतर विद्यार्थी यांच्यातर्फे सामाजिक कार्य या महाविद्यालयाने अखंड ठेवले आहे. 

संस्थेचे जेष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. राजेश घोरपडे, प्रा. डॉ. चंद्रकांत  पोतदार, प्रा. सी. एम. तेली यांनी विविध उपक्रम राबवून सामाजिक सेवेची ज्योत तेवत ठेवली आहे.

‘स्वच्छ भारत अभियानाचे’ उद्घाटन संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. राजेश घोरपडे, प्रा. डॉ. सी. बी. पोतदार व प्रा. सी. एम. तेली यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छतेचे महत्व व प्लास्टिक मुक्त परिसर’ याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून, परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला. श्रमाला मूल्य नसते. श्रमसंस्कृतीतून माणूस घडतो, विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार झाले पाहिजे. यासाठी स्वच्छ भारत अभियानाचा पाया यावेळी घालण्यात आले.

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टे पूर्ण व्हावे यासाठी वृक्षलागवडीचे काम हाती घेतले. याचे उद्घाटन गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याआधीही महाविद्यालयाने अनेक प्रकारची झाडे लाऊन त्यांचे संवर्धन केले आहे. यावर्षी दोनशे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जीवनात सावली महत्त्वाचीच आहे. पर्यावरणाचा समतोल महत्वाचा आहे. निरोगी आयुष्यासाठी वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. हे आपल्या कृतीतून महाविद्यालयाने दाखवले आहे. या उपक्रमामुळेच महाविद्यालयाचा हिरवागार परिसर आल्हाददायक वाटतोय. ‘कारगील विजय दिन’ महाविद्यालयात संपन्न झाला.

केवळ महाविद्यालय परिसरच नव्हे तर तालुक्यातील कित्येक भागत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पोहोचली. यावेळी महापुराने तालुक्यातील कित्येक गावांना फटका बसला. परिसरातील कोवाड, निट्टूर, माणगाव, धुमडेवाडी, दाटे, कोनेवाडी ई. भागातील घरे जमीनदोस्त झाली. त्यांच्या मदतीसाठी महाविद्यालय धावून गेले. महाविद्यालयातील प्राद्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांची मदत या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना लाभली. कोवाड येथे पूरग्रस्तांना प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, प्रा. डॉ. राजेश घोरपडे, प्रा. डॉ. चंद्रकांत  पोतदार आणि प्रा. सी. एम. तेली यांनी धान्याच्या स्वरुपात मदत केली तसेच पुणे, मुंबई येथील रहिवास्याच्यातर्फे मदतीसाठी प्रयत्न केले. धुमडेवाडी, दाटे व कोनेवाडी या गावात प्रत्येकी १०० विद्यार्थी व २५ प्राद्यापक, कर्मचारी यांनी स्वच्छता अभियान राबवून पुरानंतर अनेक भागांची व घरांची स्वच्छता केली. या कार्याची दखल प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार ऑफिस व पंचायत समितीतील अधिकारी यांनी घेऊन त्यांनीही भेट देऊन या कार्याची प्रशंसा केली. विशेष म्हणजे यावेळी संस्था पदाधिकाऱ्यानीही भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी सर्व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचीही मदत लाभली.

‘रक्षाबंधन’ हा एक पवित्र सण बंधू प्रेमाच्या नात्याला दृढ करण्याचा हा सन यावर्षी शिनोळी येथील अॅटलस फेअरफिल्ड लिमिटेड येथे हा संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थिनी व अॅटलस बंधू-भगिनींनी एकत्र येऊन हा कार्यक्रम अॅटलस परिसरात संपन्न झाला. अॅटसलचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच श्री. पांडुरंग पाटील यांनी विशेष सहकार्य केले यानिमित्ताने महाविद्यालयाने इंडस्टीजशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला. 

पंतप्रधानांनी ‘फिट इंडिया’ संकल्पनेची घोषणा केली. शरीर व मन सदृढ असेल तरच आदर्श नागरिक घडू शकतो. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या मोहिमेत महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना सक्रीय झाली. त्यांचे उद्घाटन व अंमलबजावणी महाविद्यालयाने केली. यावेळी प्रा. मनोहर तायडे, डॉ. राजेश घोरपडे व प्रा. सी. एम. तेली यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदरुस्तीचे मंत्र सांगून मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शरीर तंदरुस्त करण्याची शपथ घेतली.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने विद्यार्थ्यांना नुकताच सामाजिक विकासाचा धडा दिला नाही तर विद्यार्थ्याना कृतीतून ते घडवला. तालुक्यावर महापुराची आपत्ती आली आणि महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी सरसावले. याच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत तयार झालेला महाविद्यालयाचा विद्यार्थी कमलेश जाधव हा तर दूतच ठरला. रेस्क्यू ऑपरेशनपासून ते आजतागायत तो समाजाच्या सेवेत आहे. असे अनेक दूत बनावेत हा उद्देश महाविद्यालयाचा आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती मिळावी यासाठी ‘कायदेविषयक शिबिर’ महाविद्यालयात राबविण्यात आले. यावेळी न्यायाधीश अ. चं. बिराजदार सहदिवाण न्यायाधीश डी. एम. गायकवाड, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, अॅड. एम. एस. रेडेकर, अॅड. कवडे, अॅड. गवस यांनी विद्यार्थ्यांना कायदा, कायद्याची तत्वे, मानवी वर्तन, कायद्याच्या तरतुदी, गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्याचे निराकरण या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना कायदा आणि कर्तव्ये या विषयी मार्गदर्शन केले.    

पर्यावरणपूरक, श्रमसंस्कार, सामाजिक मदत, विद्यार्थ्यांच्या मन आणि मनगटाचा विकास यासाठी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना कार्य करत आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. देवानंद शिंदे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश घोरपडे, प्रा. डॉ. चंद्रकांत  पोतदार व प्रा. सी. एम. तेली तसेच सदस्य डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. एस. आर. वायकर, प्रा. एम. बी. मापटे, प्रा. पी. एम. दरेकर,  प्रा. एस. पी. गावडे, प्रा. एन. पी. पाटील यांनी विविध उपक्रम राबविले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News