महावीर महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

कोल्हापूर - महावीर महाविद्यालयाच्या बी. एम. रोटे कनिष्ठ महाविद्यालयाने गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा या वर्षीही कायम राखली. कला शाखेत सर्वाधिक ९० टक्के गुण श्रीपाद ताटे याने मिळविले.  कला शाखेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याने एक उत्तम शिक्षक होण्याची मनीषा बाळगून बी.ए., बी.एड. विभागाकडे प्रवेश घेतला.

विज्ञान शाखेचा निकाल ९० टक्के लागला. या शाखेत प्रांजल देशमुख याने प्रथम क्रमांक पटकावला. पुष्कर काने व शुभम वैरागी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटाकविला. वाणिज्य शाखेचा निकाल ८५ टक्के असून, यात उमाजी पाटील याने सर्वाधिक ८२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयाचे उपाहारगृह चालविणाऱ्या मालन पाटोळे यांची कन्या पूजा पाटोळे हिने ७६ टक्के गुण मिळaवून द्वितीय क्रमांक पटाकवला.

या विभागात प्रणाली परीटने ७५.२३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयाचे एकूण ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व एकूण निकाल ८१ टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचे आचार्यरत्न देशभूषण शिक्षणप्रसारक मंडळाचे चेअरमन ॲड. के. ए. कापसे, प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी अभिनंदन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News