बारावीच्या अभ्यासाने घेतला विद्यार्थ्याचा जीव, भिंतीवरील सुसाईड नोटचा शेवट 'आय क्विट' 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019

सुसाईड नोटमधला मजकूर
या जगात राहाणे म्हणजे विचारांपेक्षा अवघड आहे. मी प्रत्येकवेळी चांगला व्यक्ती बनन्याचा प्रयत्न केला, परंतू मी अयशस्वी ठरलो. मी तुमचा चांगला मुलगा होण्याचा प्रयत्न केला, पण मला माफ करा, मी कदाचित तुमचा चांगला मुलगा झालो नाही. "आय क्विट"

बीड - अभ्यासाचा ताणतणाव घेणारे कितीतरी विद्यार्थी आपल्या रोज पाहायला मिळतात. त्यातून काही विद्यार्थी यशस्वीरित्या पुढे यशस्वी होतात तर काही विद्यार्थी आपल्या जीवनाचा शेवट करतात. अशीच एक धक्कादायक घटना बीड मधल्या अंबाजोगाई येथे घडला आहे.

अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात बारावीत शिकणारा गुरूप्रसाद रामप्रसाद घाडगे (18) या विद्यार्थ्याने अभ्यासाचा ताण आल्याने घरातील भिंतीवर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. अंबाजोगाई येथील योगेश्वरी नगरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मागील काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता, काही दिवसांपासून क्लास तसेच महाविद्यालयातून घरी आल्यानंतर रोजच्या सारखा घरच्यांशी बोलत नसे, जास्तवेळ तो एकटा राहत असे, याप्रकारची माहिती घरच्यांनी दिली.

बुधवारी संध्याकाळी गुरूप्रसादचे आई-वडिल घरी आल्यानंतर गुरूप्रसादच्या अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावण्यात आला होता, खूप आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला आणि संबंधीत घटना उघड झाली. एका बाजूला गुरूप्रसादने गळफास लावून घेतली होती,  तर दुसऱ्या बाजूला एका भिंतीवर गुरूप्रसादने सुसाईड नोट लिहली होती.

सुसाईड नोटमधला मजकूर
या जगात राहाणे म्हणजे विचारांपेक्षा अवघड आहे. मी प्रत्येकवेळी चांगला व्यक्ती बनन्याचा प्रयत्न केला, परंतू मी अयशस्वी ठरलो. मी तुमचा चांगला मुलगा होण्याचा प्रयत्न केला, पण मला माफ करा, मी कदाचित तुमचा चांगला मुलगा झालो नाही. "आय क्विट"

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News