अकोल्यात कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांच्याच हाती चुकीचे पेपर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

कायदा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने न्याय दिला आहे.

अकोला - कायदा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने न्याय दिला आहे. परीक्षा काळात चुकीचे पेपर दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. तो अॅडमिनिस्टेट्यू लाॅ विषयच्या पेपरची परीक्षा २२ जून रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.       डाबकी रोड स्थित खंडेलवाल महाविद्यालय येथे विधी अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू असताना अमरावती विद्यापीठातील  ८०/२० पॅटर्नचा अभ्यासक्रम असताना विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर चुकीचा पेपर देण्यात आल्या होता.

असाच प्रकार वाशीम जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावरही घडला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थांना परीक्षेमध्ये अपयशी ठरण्याची भिती निर्माण झाली होती. त्यावर महाराष्ट्र स्टुडंट्स लाॅ असोसिएशन (मसला) अमरावती-नागपूर विभागाचे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी विद्यापीठ प्रशासनासह राज्यपालांकडे तक्रार केली होती. तरीसुद्धा विद्यापीठाकडून  प्रश्न निकाली न लागल्यामुळे अंकुश गावंडे यांनी थेट कुलगुरू यांच्या दालनात या सर्व तक्रारी घेवून कैफीयत मांडली.

विद्यापीठ प्रशानाने त्यानंतर  अॅडमिनिस्टेट्यू लाॅ विषयाची पुन्हा परीक्षा घेण्यासाठी नवीन वेळापत्रक काढले.त्यानुसार आता २२ जून रोजी या हा पेपर घेण्यात येणार आहे. या बाबतचा ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News